Babita Phogat On Vinesh Phogat Disqualification : सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. तिच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिचे काका व पद्मश्री महावीर फोगाट यांनी विनेशला हा निर्णय मागे घेण्यासाठी समजावणार असल्याचे म्हटलेले. आत्ता याच प्रकरणावर तिची चुलत बहीण व माजी कुस्तीपटू बबिता फोगट हिने प्रतिक्रिया दिली आहे.
अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरल्यानंतर विनेशने कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर बोलताना बबिता म्हणाली, “केवळ मला आणि माझ्या कुटुंबालाच नाही तर संपूर्ण देशाला या संपूर्ण प्रकरणामुळे दुःख झाले आहे. आम्ही विनेशला धीर देऊ, आमचे संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी उभे आहे. आम्ही तिच्याशी बोलून तिला पुन्हा मॅटवर आणू आणि तिला 2028 च्या ऑलिम्पिक खेळण्यासाठी प्रोत्साहान देऊ.”
तसेच, ती पुढे म्हणाली की, “असे बोलले जात आहे की, विनेशसोबत कट झाला आहे. मात्र, असा कोणताही कट रचण्यात आलेला नाही. 2012 मध्ये मी स्वतः 200 ग्रॅम वजन अधिक असल्याने अपात्र ठरली होती. त्यानंतर मी आशियाई चॅम्पियनशिप खेळू शकली नव्हती. यापूर्वीही अनेक खेळाडू जास्त वजनामुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचे षडयंत्र नाही.” बबिता ही भारताची माजी कुस्तीपटू राहिली असून, सध्या ती राजकारणात भारतीय जनता पक्षाची नेता म्हणून काम करते.
सलग तीन सामने जिंकल्यानंतर विनेश फोगटचा महिलांच्या 50 किलो वजनी गटात सुवर्णपदकाचा सामना होणार होता. परंतु त्याआधीच 100 ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले होते. यानंतर निराश होत तिने निवृत्ती जाहीर केली. आता या प्रकरणावर क्रीडा लवादाकडे दाद मागितली गेली आहे. याचा निकाल पॅरिस ऑलिंपिकच्या अखेरीस येऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
भाला कशापासून बनतो? भालाफेकीचा इतिहास काय? रंजक माहिती जाणून घ्या
विनेशसाठी धावून आला सचिन तेंडूलकर; गणित समजावत म्हणाला, “तिला रौप्य पदक…”
नीरज चोप्राच्या आईनं केलेल्या वक्तव्यावर कुस्तीपटू बजरंग पुनिया भावूक! म्हणाला…