---Advertisement---

“अफगाणिस्तानकडे मोदींसारखा नेता नव्हता”, राष्ट्रकुल विजेत्या बबिता फोगटची प्रतिक्रिया

On: मंगळवार, ऑगस्ट 17, 2021 3:35 PM
---Advertisement---

भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या अफगाणिस्तानची एकूणच परिस्थिती सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. अफगाणिस्तान सरकारचा पाडाव करून तालिबानने २० वर्षांनंतर पुन्हा एकदा देशावर कब्जा केला असून, देशातील नागरिक इतरत्र स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. तालिबानकडून निरपराध लोकांची हत्या होत असताना जगभरातून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. भारताची माजी महिला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व भाजपा नेता बबिता फोगट हिने अफगाणिस्तानमधील परिस्थितीविषयी आपली प्रतिक्रिया दिली.

अफगाणिस्तानकडे मोदींसारखा नेता नाही
भारताची माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहिलेल्या बबिता फोगट हिने अफगाणिस्तानमधील परिस्थितीविषयी आपली प्रतिक्रिया देताना एक ट्विट केले. तिने लिहीले, ‘अफगाणिस्तानमध्ये स्वस्त पेट्रोल होते, स्वस्त डिझेल होते, स्वस्त कांदेही होते. मात्र, नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता नव्हता.’

देश संकटात असताना अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी देश सोडून परदेशात पळून गेले आहे.

भाजप नेता आहे बबिता
बबिता फोगट ही व्यावसायिक कुस्ती सोडल्यानंतर राजकारणात सक्रिय झाली. ऑगस्ट २०१९ मध्ये तिने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्याच वर्षी झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत दादरी येथून निवडणूक लढवताना तिला पराभव पत्करावा लागलेला. बबिता अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ट्विट करत असते. तिच्या काही वादग्रस्त ट्विटमुळे अनेक लोक तिला ट्रोलही करत असतात.

राष्ट्रकुल विजेती आहे बबिता
आपली मोठी बहीण गीता फोगट हिच्याप्रमाणे बबिता हिने देखील अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१४ ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत तिने देशासाठी कुस्तीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. २०१० दिल्ली व २०१८ गोल्ड क्वेस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत तिने रौप्य पदक पटकावले. तसेच, २०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये ती सहभागी झालेली. २०१२ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिच्या नावे कांस्यपदक आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

तीन वर्षांपूर्वी भारतासाठी डोकेदुखी ठरलेला सॅम करन यंदा फेल; ‘हा’ नकोसा विक्रम करणारा बनला चौथाच इंग्लिश खेळाडू

तालिबानमुळे क्रिकेटला बसणार फटका? अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डच्या अधिकाऱ्याने दिले उत्तर

भारतप्रेम की वेडेपणा? लाईव्ह सामन्यात भारतीय खेळाडू असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीचे ‘हे’ ट्वीट व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---