पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी-पुसाळकर सु-रक-क्षा कंपोनंट्स पीवायसी प्रीमियर लीग क्रिकेट 2019 स्पर्धेत टस्कर्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत दुसरा विजय मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत श्रीनिवास चाफळकर(55धावा व 1-11)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टस्कर्स संघाने विअरवूल्वसचा 20धावांनी पराभव करून दुसरा विजय मिळवला. टस्कर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 6षटकात 1बाद 84धावा केल्या. यात श्रीनिवास चाफळकरने 20चेंडूत 4चौकार व 5षटकारांच्या मदतीने 55 धावा, तर हर्षल गंद्रेने नाबाद 28धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. याच्या उत्तरात विअरवूल्वस संघाला 6षटकात 2बाद 64धावाच करता आल्या. यात कृष्णा मेहता नाबाद 34, जयदीप गोडबोले 19 यांची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. टस्कर्सकडून श्रीनिवास चाफळकर(1-11) यांनी सुरेख गोलंदाजी केली. दुसऱ्या सामन्यात नकुल पटेल नाबाद 24धावा व चारुदत्ता दातार नाबाद 21धावांच्या खेळीच्या जोरावर चिताज संघाने विअरवूल्वसवर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. तिसऱ्या लढतीत मधुर इंगहाळीकर नाबाद 35धावा, अमित कुलकर्णी 15धावा व अभिषेक ताम्हाणे नाबाद 13धावांच्या जोरावर टायगर्स संघाने डॉल्फिन्स संघाचा 7गडी राखून पराभव करून पहिला विजय मिळवला.
अन्य लढतीत अंकुश जाधवच्या 35धावांच्या खेळीच्या जोरावर स्कायलार्कस संघाने डॉल्फिन्सचा 5गडी राखून पराभव केला. स्कॅवेंजर्स संघाने जॅगवॉर्स संघाचा 20धावांनी तर, रायनोज संघाने टायगर्स संघाचा 14धावांनी पराभव करून विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
साखळी फेरी:
विअवूल्वस: 6षटकात 6बाद 41धावा(कृष्णा मेहता 10, जयदीप गोडबोले 7, आत्मन बागमार 1-5, राहुल पंडित 1-8)पराभूत वि.चिताज: 3.4षटकात बिनबाद 46धावा(नकुल पटेल नाबाद 24(13), चारुदत्ता दातार नाबाद 21(9));सामनावीर-नकुल पटेल;
डॉल्फिन्स: 6षटकात5बाद 65धावा(आश्विन शहा 28(12,3×6), रोहन छाजेड 13, सुधांशू मेडसीकर 14, रोहित मेहेंदळे 2-10, अभिषेक ताम्हाणे 2-6)पराभूत वि.टायगर्स: 5.3षटकात 1बाद 66धावा(मधुर इंगहाळीकर नाबाद 35(17,1×4,4×6), अमित कुलकर्णी 15(8,3×4), अभिषेक ताम्हाणे नाबाद 13(8,1×4), आश्विन शहा 1-5);सामनावीर-मधुर इंगहाळीकर;
डॉल्फिन्स: 6षटकात बिनबाद 72धावा(रोहन छाजेड नाबाद 38(19,3×4,2×6), आश्विन शहा नाबाद 30(18,3×4,1×6)) पराभूत वि.स्कायलार्कस: 5.2षटकात 2बाद 73धावा(अंकुश जाधव 35(17,3×4,3×6), आशिष राठी नाबाद 19, आशय कश्यप 1-10);सामनावीर-अंकुश जाधव;
स्कॅवेंजर्स: 6षटकात 2बाद 67धावा(सुमेध शहा 40(20,2×4,3×6), नचिकेत जोशी नाबाद 23(14), समीर जोशी 1-13, रवींद्र कासट 1-10)वि.वि.जॅगवॉर्स: 6षटकात 2बाद 47धावा(समीर जोशी नाबाद 20, अक्षय ओकी 17, तन्मय चोभे 1-5, नंदन डोंगरे 1-12);सामनावीर-सुमेध शहा;
टस्कर्स: 6षटकात 1बाद 84धावा(श्रीनिवास चाफळकर 55(20,4×4,5×6), हर्षल गंद्रे नाबाद 28(16,2×4,1×6), कृष्णा मेहता 1-13)वि.वि.विअरवूल्वस: 6षटकात 2बाद 64धावा(कृष्णा मेहता नाबाद 34(19,3×4,1×6), जयदीप गोडबोले 19(11), श्रीनिवास चाफळकर 1-11);सामनावीर-श्रीनिवास चाफळकर;
रायनोज: 6षटकात 1बाद 68धावा(रोहित बर्वे नाबाद 26(13,2×4,1×6), अमित परांजपे नाबाद 19, शिव किर्लोस्कर 18, रोहित मेहेंदळे 1-5)वि.वि.टायगर्स: 6षटकात 3बाद 54धावा(अभिषेक ताम्हाणे 32(16,1×4,3×6), मधुर इंगहाळीकर 13, राघव बर्वे 1-9);सामनावीर-रोहित बर्वे.