---Advertisement---

व्वा! वॉशिंग्टन सुंदरच्या प्रदर्शनाची ‘भारताच्या फुलराणी’ला पडली भुरळ, कौतुक करत म्हणते…

On: गुरूवार, एप्रिल 15, 2021 11:13 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने अलिकडच्या काळात खूप चांगली खेळी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण गाजवल्यानंतर त्याने इंग्लंडविरुद्धच्याही मालिकेत शानदार प्रदर्शन केले. तो उत्कृष्ट असा डावखुरा फलंदाज असून दमदार फिरकी गोलंदाज देखील आहे. त्याच्या कामगिरीचे अनेक दिग्गजांनी तोंडभरून कौतुक केले आहे. त्या कौतुक करणाऱ्यांमध्ये आता भारताची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालचेही नाव जोडले गेले आहे.

‘भारताची फुलराणी’ सायना नेहवालने ट्विट करून सुंदरच्या खेळाचे कौतुक करताना म्हटले आहे की, “मला वॉशिंग्टन सुंदरचा खेळ खूप आवडतो. बऱ्याच लोकांना माहिती नाही की मी सुद्धा क्रिकेटची चाहती आहे. त्यामध्ये विशेषत: जेव्हा भारत खेळत असतो तेव्हा अलीकडच्या काळात मी वॉशिंग्टन सुंदरने केलेली उत्तम कामगिरी पाहिली आहे आणि त्याची फलंदाजी पाहून मला खूप आनंद झाला होता.”

2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात सुरुवातीला नेट गोलंदाज म्हणून निवड झालेल्या या तमिळनाडूच्या खेळाडूने अनुभवी खेळाडू जखमी झाल्याने चौथ्या कसोटी सामन्याद्वारे पदार्पण केले होते. त्यामध्ये त्याने आपल्या कामगिरीने सर्वांना चकित केले होते. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात त्याने मोठी भूमिका बजावली होती. त्याने पदार्पणाच्या पहिल्या कसोटी डावात केवळ अर्धशतकच झळकावले नाही तर या कसोटी सामन्यात एकूण चार बळीही घेतले होते.

वॉशिंग्टनला फक्त एका कानाने ऐकू येते
बहुतेक लोकांना वॉशिंग्टन सुंदरला फक्त एकाच कानाने ऐकू येते याची माहिती नसेल. परंतु हे अगदी खरे आहे की तो फक्त एका कानाने ऐकू शकतो. एकदा एका मुलाखतीत त्याने आपल्याला बालपणातच या आजाराबद्दल माहिती मिळाली असल्याचा खुलासा केला होता. त्यामुळे कधीकधी त्याला मैदानावर सहकारी खेळाडूंशी संवाद साधणे अवघड जाते.

महत्त्वाच्या बातम्या-

RCBvsSRH: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संकटमोचक, शाहबाज अहमद आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण माहिती

भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या ‘मिस्टर ३६०’ला फलंदाजी करताना ‘या’ गोष्टीची वाटते भिती, घ्या जाणून

विराटसेना पुढे वॉर्नरची पलटण फेल! कर्णधाराने ‘या’ खेळाडूंच्या माथी फोडले पराभवाचे खापर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---