---Advertisement---

बाळासाहेबांचे क्रिकेट प्रेम! केवळ दहा मिनिटे सामना बघेन म्हणतं शेवटपर्यंत जागेवरुन हाललेही नाहीत

On: शनिवार, जानेवारी 23, 2021 11:00 AM
---Advertisement---

“बाळासाहेब ठाकरे” हे नाव ऐकल्यानंतर आपल्या मनात नेहमी एका लोकप्रिय राजकीय नेत्याची प्रतिमा तयार होते. मात्र एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचे असे अनेक पैलू असतात ज्यांचा लोकांना फारसा परिचय नसतो. अशाच प्रकारे अनेकांना बाळासाहेबांच्या क्रिकेट प्रेमाची फारशी माहिती नाही. खरंतर बाळासाहेब हे क्रिकेटचे फार मोठे चाहते होते व याचा उलगडा एका मुलाखतीत भारताचे माजी दिग्गज क्रिकेट खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी केला होता.

बाळासाहेबांच्या क्रिकेट बद्दलच्या आठवणी सांगताना वेंगसरकर म्हणाले , “बाळासाहेबांबद्दल एक गोष्ट निश्चित होती की, आम्ही चांगली कामगिरी करो अथवा खराब, त्यांचा नेहमी फोन यायचाच. पराभवानंतर ते आपुलकीने विचारायचे की कशामुळे पराभव होतोय?, अथवा काही बदल करायला हवेत का?. कारण बाळासाहेबांना क्रिकेटची प्रचंड आवड होती व ते नेहमी क्रिकेट सामने बघायचे.”

बाळासाहेबांच्या क्रिकेट प्रेमाची आठवण करून देताना वेंगसरकर यांनी एक घटना सांगितली होती. वेंगसरकर म्हणाले ,”मला आठवतं की 1995 साली भारत विरुद्ध वेस्टइंडीजचा एक सामना झाला होता. मी या सामन्याचे आमंत्रण देण्यासाठी बाळासाहेबांकडे गेलो होतो. बाळासाहेबांनीही सामना बघायला होकार दिला, पण ते म्हणाले की मी केवळ दहा मिनिटेच येऊ शकतो. कारण मी तिथे आल्यानंतर सिक्युरिटी व इतर यंत्रणेवर ताण पडेल. मात्र बाळासाहेब जेव्हा सामना बघण्यासाठी आले; तेव्हा त्यांनी शेवटपर्यंत सामना बघितला. कारण त्यांचे क्रिकेटवर फार प्रेम होते.”

सुनिल गावसकरांना केले प्रोत्साहित

‘लिटल मास्टर’ सुनील गावसकर यांनी देखील एका कार्यक्रमात बाळासाहेबांबद्दलच्या आठवणी सांगितल्या होत्या. गावसकर म्हणाले होते, “मी जेव्हा खराब फॉर्ममध्ये होतो तेव्हा बाळासाहेबांनी मला फोन केला होता. ते म्हणाले होते की, काहीही काळजी करू नकोस क्रिकेटपटूसोबत असं होतच असतं. लवकरच तुझा फॉर्म पुन्हा येईल व तू पुन्हा शतक ठोकशील. बाळासाहेबांच्या या शब्दांमुळे मला आत्मविश्वास मिळाला. आपले कुटुंबीय नेहमीच आपल्याला हिम्मत देत असतात, पण बाळासाहेबांसारख्या आदरणीय व्यक्तीने आत्मविश्वास दाखवल्याने निश्चितच फरक पडतो.”

महत्त्वाच्या बातम्या-

अन् डॉन ब्रॅडमन भारताच्या महान फलंदाजाला शिवसेना व बाळासाहेबांबद्दल विचारत होते…

“मला कोहलीच्या विरुद्ध काही बोलायचे नाही, परंतु…” गौतम गंभीरची विराटवर टीका

आर आश्विनने भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्रींची केली नक्कल, बघा व्हिडिओ 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---