---Advertisement---

Captain vs Captian: एलिसा हिलीने अडवला चेंडू; हरमनप्रीतला राग अनावर, पण पंचांचा निर्णय मात्र…

Harmanpreet-Kaur-And-Alyssa-Healy
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वानखेडेवर एकमेव कसोटी सामना आयोजित करण्यात आला होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली यांच्यात जोरदार वादावादी झाली. भारतीय महिला संघाने या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघावर मोठा विजय मिळवला आहे.

सामन्याच्या तिसर्‍या दिवशी हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि एलिसा हिली (Alyssa Healy) दोघी समोरासमोर आल्या होत्या. ही घटना ऑस्ट्रेलियन डावाच्या 80 व्या षटकात घडली, जेव्हा हीली 28 धावांवर फलंदाजी करत होती. हरमनप्रीत कौर तिचं दुसरं षटक टाकायला आली होती. तेव्हा ऑस्ट्रेलियाची कर्णधार हीली पुढे आली आणि कौरच्या फुल लेन्थ चेंडूवर बचावात्मक शॉट खेळला. चेंडू हरमनप्रीतकडे आला तिने चेंडू उचलला आणि थेट हिलीच्या दिशेने फेकला आणि हिलीने तो चेंडू बॅटने अडवला. चेंडू एलिसा हिलीच्या बॅटला लागून स्लिप क्षेत्ररक्षकाच्या दिशेला चौकार गेला आणि ऑस्ट्रेलियाला ओव्हर थ्रोच्या रूपात चार धावा मिळाल्या. यादरम्यान हरमनप्रीत कौर आणि एलिसा हिली यांच्यात बाचाबाची झाली. चेंडू बॅटने अडवल्यामुळे हरमनप्रीत कौरने हिलीविरुद्ध अपील केले. पण तिसऱ्या पंचांशी बोलल्यानंतर पंचांनी अपील फेटाळले.

एलिसा हिलीने चेंडू स्वत:ला लागण्यापासून रोखला होता, असा पंचांचा निर्णय आला. त्यामुळे ती मैदानात अडथळा आणत नसल्याचे पंचांनी मानले. मात्र, हरमनप्रीत कौरने हिलीला एलबीडब्ल्यू आऊट करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अलीकडेच बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमला न्यूझीलंडविरुद्ध चेंडू हाताने पकडण्याचा प्रयत्न केल्यामुळे बाद देण्यात आले होते. (Ball intercepted by Alyssa Healy Harmanpreet is angry but the umpire’s decision)

हेही वाचा

मोठी बातमी: क्रीडा मंत्रालयाकडून नवनियुक्त भारतीय कुस्ती महासंघ निलंबित
हरमनसेनेचा भीमपराक्रम! वानखेडे कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या नांग्या ठेचत घडवला इतिहास, स्मृतीचा विजयी चौकार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---