पॅरीस। स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी आणि क्रिस्तियानो रोनाल्डो यांचे मागील दहा वर्षे वर्चस्व असणाऱ्या बॅलोन दी’ओर पुररस्कारावर लुका मोड्रिचने आपले नाव कोरले आहे.
मोड्रिचने रियल माद्रीदकडून खेळताना २०१८ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तसेच रशियात झालेल्या २१व्या फुटबॉल विश्वचषकात क्रोएशिया संघाला अंतिम सामन्यात पोहचवले.
“जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपली खूप काही स्वप्ने असतात. माझे स्वप्न मोठ्या फुटबॉल क्लबकडून खेळणे आणि महत्त्वाचे पुरस्कार जिंकणे हे होते”, असे मोड्रीच म्हणाला.
तसेच मोड्रिच हा २०१८ फिफा विश्वचषकाचा गोल्डन बूट विजेता आहे. त्याने युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या (युइएफए) २०१७-१८च्या पुरूष प्लेयर ऑफ दी इयरचा किताबही पटकावला आहे.
१९५६पासून फ्रान्स फुटबॉल मॅगझिनने हा पुरस्कार देण्यास सुरूवात केली. तर यावर्षी महिलांमध्ये पहिल्यांदाच हा पुरस्कार देण्यात आला.
नॉर्वेजियन फुटबॉलपटू अदा हेजरबर्गने या पुरस्कारावर नाव कोरले. फ्रेंच क्लब लायनकडून खेळताना तिने तीन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तर मागील हंगामात विक्रमी १५ गोल केले होते. मात्र तिला आतंरराष्ट्रीय स्तरावर गोल करण्यात अपयश आले आहे.
रोनाल्डो आणि मेस्सी या दोघांनी प्रत्येकी पाच वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.
रोनाल्डोचे सहावा विक्रमी बॅलोन दी ओर पुरस्कार थोडक्यात मुकला. तो या पुरस्काराच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तसेच फ्रान्सचा अॅटोनि ग्रीझमन तिसऱ्या तर कायलिन एमबाप्पे चौथ्या क्रमांकावर राहिला.
मेस्सी पाचव्या क्रमांकावर राहिला. मागील दोन वर्षापासून तो या पुरस्काराचा उपविजेता राहिला होता. तर २००७पासून प्रत्येक वर्षी पहिल्या तीन मध्ये होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: पेनल्टी, स्वयंगोलसह दिल्ली मुंबईकडून गारद
–हॉकी विश्वचषक २०१८: अर्जेंटिनाचा संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल
–विराट कोहली त्या कॅप्शनमुळे झाला सोशल मीडियावर ट्रोल