---Advertisement---

संतापजनक! कोरोना पाॅझिटीव्ह असूनही ‘तो’ क्रिकेटर उतरला मैदानावर, अन्…

On: बुधवार, नोव्हेंबर 4, 2020 10:35 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरसदरम्यान सुरू असलेल्या सर्व क्रिकेट स्पर्धांमध्ये आरोग्याबाबत आवश्यक काळजी घेतली जात आहे. खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आयसीसी क्रिकेट बोर्ड जैव- सुरक्षित वातावरणात क्रिकेटचे आयोजन करत आहेत. अशामध्येच पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणारा एक क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह असूनही क्रिकेट खेळत राहिला. त्या खेळाडूचे नाव बिस्मिल्लाह खान असे आहे. त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या कायदे आझम या देशांतर्गत स्पर्धेत तो खेळत होता. ईएसपीएन क्रिकइंफोने दिलेल्या वृत्तानुसार, “बलूचिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज बिस्मिल्लाह खानमध्ये दक्षिण पंजाबविरुद्धच्या सामन्यादरम्यान कोरोनाची लक्षणे दिसत होती. परंतु चौथ्या दिवसापर्यंत त्याची चाचणी केली नाही. यानंतर अदनाक अकमलने त्याची जागा घेतली.”

या प्रकरणानंतर कायदे आझम स्पर्धेवर चिंतेचं सावट पसरलं आहे. कारण स्पर्धेतील सर्व ६ संघ एकाच हॉटेलमध्ये होते. परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुष्टी केली आहे की, ” कायदे आझम ट्रॉफीत भाग घेणारे सर्व १३२ खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि सामना अधिकाऱ्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. सोबतच शुक्रवारपासून (६ नोव्हेंबर) होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात भाग घेण्यासाठी त्यांना फीट घोषित केले आहे.”

कायदे आझम ट्रॉफीसाठी जैव- सुरक्षित वातावरण बनवले होते. कराचीमध्ये बनवण्यात आलेल्या या वातावरणात खेळाडूंची चाचणी केल्याचा दावा करण्यात आला. पीसीबीने आपल्या या देशांतर्गत स्पर्धेत एकूण १०९१ कोरोना चाचण्या केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

-रोहितसाठी देश जास्त महत्त्वाचा का आयपीएल? माजी निवडकर्त्याच्या प्रश्नाने सोशल मीडियावर खळबळ

-शतकांच्या ‘या’ मोठ्या विक्रमात पाकिस्तानी खेळाडूची हवा, विराट कोहलीवरही ठरला वरचढ

-Eliminator: प्ले ऑफमध्ये पोहोचल्यानंतर हैदराबादच्या वॉर्नरचं कोहलीला ‘विराट’ चॅलेंज

ट्रेंडिंग लेख-

-आर्थिक तंगीमुळे एकेवेळी प्लंबिंग व्हॅन चालणारा क्रिकेटर पुढे वेगाचा बादशाह झाला…

-आयपीएल २०२०: प्रतिभा असूनही ‘हे’ पाच खेळाडू राहिले वंचित, नाही मिळाली संधी

-मुंबईचे ३ धडाकेबाज खेळाडू, ज्यांना पुढील हंगामात केले पाहिजे रिलीझ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---