इंग्लंड संघ 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात इंग्लंडने वनडे मालिका 2-1ने खिशात घातली. मात्र, टी20 मालिकेत त्यांना सपाटून पराभवाचा सामना करावा लागला. बांगलादेशने इंग्लंडला 3-0ने क्लीन स्वीप दिला. टी20 मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी (दि. 14 मार्च) ढाका येथे खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने इंग्लंडला 16 धावांनी पराभवाची धूळ चारली. त्यांनी प्रत्येक विभागात इंग्लंडला मात दिली. इंग्लंडविरुद्धच्या मालिका विजयाचा आनंद बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याच्या चेहऱ्यावरही दिसला. त्याने किताब पटकावल्यानंतर यशाचा खुलासा केला.
काय म्हणाला शाकिब?
शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) म्हणाला की, त्याने कधीच विचार केला नव्हता की, त्यांचा संघ टी20 चॅम्पियनला क्लीन स्वीप करण्यात यशस्वी होईल. शेवटच्या सामन्यात मिळालेल्या विजयानंतर त्याने म्हटले की, त्यांनी हा विजय खेळाडूंच्या शानदार क्षेत्ररक्षणामुळे मिळवला. याव्यतिरिक्त विरोधी संघाकडे व्यावसायिक फलंदाजाची कमतरता होती, ज्याचा त्यांनी पुरेपूर फायदा उचलला.
तो म्हणाला की, “मला वाटते आम्ही शानदार क्षेत्ररक्षण केले. ज्या क्रिकेट प्रकारात दोन-चार धावाही मोठे अंतर निर्माण करतात, त्यामध्ये प्रत्येकाने आमच्या क्षेत्ररक्षणावर लक्ष दिले. आम्ही विरोधी संधीला मैदानाबाहेर केले होते, जे स्वत: चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जातात. जेव्हा मी सामन्याच्या प्रत्येक पैलूबद्दल विचार करतो, तेव्हा मला दिसते की, आमच्या क्षेत्ररक्षणात मोठी सुधारणा झाली आहे.”
A huge victory for Bangladesh 💥
The Tigers have whitewashed the reigning Men's #T20WorldCup Champions England 3-0 in the T20I series 🔥#BANvENG | 📝: https://t.co/muxyBFMbjA pic.twitter.com/pZfKZmXjoH
— ICC (@ICC) March 14, 2023
“आम्हाला प्रत्येक सामन्यात सातत्याने चांगले क्षेत्ररक्षण केले पाहिजे. आम्ही एक लक्ष्य ठरवले आहे. आम्हाला आशियातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणारा संघ बनायचे आहे. मागील मालिकेतील प्रदर्शन पाहून वाटत नाही की, आम्ही त्यापासून जास्त मागे आहोत,” असेही शाकिब पुढे म्हणाला.
शाकिबने विरोधी संघाच्या कमकुवतपणावरही भाष्य केले. तो म्हणाला की, “त्यांच्याकडे जॅक्सचा बदली खेळाडू नव्हता. अशा स्थितीत ते अधिकतर अष्टपैलूंच्या जोरावर मैदानात उतरले होते. आम्ही त्यांच्या याच कमजोरीचा फायदा उचलला.” पुढे बोलताना तो म्हणाला की, “मालिका सुरू होण्यापूर्वी आम्ही आत्मविश्वासाने भरलेलो होतो. यामागील कारण मायदेशातील मैदान होते. याव्यतिरिक्त आम्ही त्यांच्या फलंदाजांच्या अनुपस्थितीचाही फायदा उचलला. आमच्यासाठी जमेची बाजू ही होती की, त्यांचे तीन-चार फलंदाज बाद झाल्यानंतर तळात व्यावसायिक फलंदाज नव्हते.”
विशेष म्हणजे, बांगलादेशने टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला 6 विकेट्सने, दुसऱ्या सामन्यात 4 विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात 16 धावांनी पराभूत करत मालिका सहजरीत्या खिशात घातली. विशेष म्हणजे, इंग्लंडने 2022चा टी20 विश्वचषक नावावर केला होता. अशा चॅम्पियन संघाला पराभूत केल्यामुळे बांगलादेश संघ भलताच आनंदी आहे. (ban vs eng after defeating england captain shakib al hasan told the secret)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय दिवस आलेत! फिनिशर दिनेश कार्तिकने गावसकरांना दिले फलंदाजीचे धडे, 25 लाख लोकांनी पाहिला व्हिडिओ
हरमनप्रीत आहे WPLचे सलग 5 सामने जिंकणारी कर्णधार, पण IPLमध्ये अशी कामगिरी करणारा कॅप्टन कोण?