इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीतून बाहेर आला आहे. तसेच तो चांगलाच फॉर्ममध्ये असल्याचे देखील दिसून येत आहे. दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याला आयपीएल स्पर्धेतून देखील माघार घ्यावी लागली होती. त्यांनतर आता त्याने जोरदार पुनरागमन केले आहे. त्याने सेकंड इलेव्हेन चॅम्पयनशिपच्या सामन्यात टाकलेल्या एका चेंडूची चांगलीच चर्चा रंगली आहे. हा चेंडू पाहून फलंदाज देखील थक्क झाला होता. या चेंडूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
ससेक्स आणि सरे यांच्यात झालेल्या सामन्यात जोफ्रा आर्चरने दुखापतीतून जोरदार पुनरागमन केले आहे. त्याने सरेच्या मध्य क्रमातील फलंदाज रिफरला असा काही चेंडू टाकला होता. जो पाहून फलंदाज देखील आश्चर्यचकीत झाला होता. त्याने रिफरला बनाना चेंडू टाकून, यष्टीचित करत माघारी धाडले होते. हा व्हिडिओ ससेक्स क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आर्चरने जगभरातील अनेक फलंदाजांना आपल्या स्विंगने आणि गतीच्या जोरावर माघारी धाडले आहे. यासोबतच त्याने सरेविरुद्ध फलंदाजी करताना देखील तुफान फटकेबाजी केली होती. त्याने अवघ्या ४६ चेंडूत ३५ धावांची खेळी केली होती. यात त्याने ३ चौकार आणि २ षटकार लगावले होते.
Not a bad delivery! 😅
Two wickets for @JofraArcher against Surrey's second XI yesterday, including this one… ☄️ pic.twitter.com/vBc5s09l4B
— Sussex Cricket (@SussexCCC) May 7, 2021
काय असतं बनाना स्विंग?
बनाना स्विंग हा रिव्हर्स स्विंग गोलंदाजीचा एक प्रकार आहे. चेंडूला स्विंग मिळण्यासाठी अधिक गतीची आवश्यकता असते. या चेंडूला वेगवान यॉर्कर चेंडू देखील म्हटले जाऊ शकते. परंतु हा चेंडू केळीच्या आकारात स्विंग होतो. म्हणजेच हा चेंडू सुटताच हवेत ‘सी’ च्या आकारात जातो. हा चेंडू टाकण्याची सुरुवात माजी पाकिस्तानी गोलंदाज वकार युनूसने केली होती. त्यांनतर आता अनेक गोलंदाजांनी ही कला अवगत केली आहे.
दुसऱ्या डावात नाही केली गोलंदाजी
परंतु, जोफ्रा आर्चर, दुसऱ्या डावात गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलाच नाही. आर्चरची फिटनेस अजूनही ससेक्स संघासाठी चिंतेची बाब आहे. येत्या काही दिवसात इंग्लंड संघ न्यूझीलंड संघाविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे आर्चरच्या फिटनेसमुळे इंग्लंड संघाच्या चिंतेत वाढ होऊ शकते.
आर्चरने फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारतीय संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत आणि टी-२० मालिकेत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनतर त्याला दुखापतीमुळे वनडे मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. तसेच दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला आयपीएल २०२१ स्पर्धेला देखील मुकावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
चॅपेल यांच्या भडकण्याचे कारण ऐकून व्हीव्हीएस लक्ष्मणही झाला होता चकीत, वाचा काय होते कारण
तेव्हा सचिनच्या आईने पाहिला होता सचिन खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना