बांगलादेश क्रिकेट बोर्डानं (BCB) आयसीसी टी20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. बांगलादेशच्या टी20 संघात कोणतेही मोठे बदल झालेले नाहीत. झिम्बाब्वे विरुद्ध नुकत्याच संपलेल्या पाच सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भाग घेतलेले जवळपास सर्व खेळाडू विश्वचषक संघाचा भाग आहेत. बांगलादेशनं ही टी20 मालिका 4-1 अशी जिंकली होती.
बांगलादेश क्रिकेट बोर्डानं नजमुल हुसेन शांतोला संघाचा कर्णधार बनवलं आहे. तर तस्किन अहमद संघाचा उपकर्णधार असेल. बांगलादेशच्या संघात अनुभवासोबतच नव्या खेळाडूंचाही भरणा आहे. मात्र या संघात अनुभवी मुशफिकर रहीमचा समावेश नाही. त्यानं 2022 आशिया चषक स्पर्धेनंतर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
टी20 विश्वचषकात बांगलादेश आपला पहिला सामना 8 जून रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. संघ विश्वचषकाच्या ‘ड’ गटात आहे. या गटात बांगलादेशसह श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड आणि नेपाळ यांचा समावेश आहे. बांगलादेशला 10 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा साखळी सामना खेळायचा आहे. त्यानंतर 13 जूनला त्यांचा सामना नेदरलँडशी होईल. तर 16 जूनला नेपाळचं आव्हान असेल.
बांगलादेशचे पहिले दोन साखळी सामने अमेरिकेत, तर उर्वरित दोन सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळले जातील. यावेळी आयसीसी टी20 विश्वचषक 2024 अमेरिका आणि वेस्ट इंडिज संयुक्तपणे आयोजित करत आहे.
टी20 विश्वचषक 2024 साठी बांगलादेशचा संघ – नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तस्किन अहमद (उपकर्णधार), लिटन कुमार दास, सौम्य सरकार, तनजीद हसन तमीम, शाकिब अल हसन, तौहीद हृदय, महमुदुल्लाह रियाद, जेकर अली अनिक, तन्वीर इस्लाम, साकिब मेहंदी हसन, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, तनजीद हसन साकिब.
राखीव खेळाडू – अफिफ हुसैन, हसन महमूद
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमधील ‘या’ संघांना बसला मोठा झटका ! प्लेऑफ आधीच अनेक खेळाडू मायदेशी परतले । IPL Updates
क्रिकेटमध्ये ‘नेट रन रेट’ कसा मोजला जातो? सोप्या भाषेत समजून घ्या संपूर्ण सूत्र
वर्षाला किती कमाई करतो शुबमन गिल? टीम इंडियाच्या ‘प्रिंस’ची एकूण संपत्ती किती?