---Advertisement---

जोडीदारानेच ज्याच्यावर भर मैदानात उगारला होता हात, त्यानेच टी२०त ४ विकेट्स घेत कांगारूंना चारली धूळ

On: बुधवार, ऑगस्ट 4, 2021 8:39 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघात ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना मंगळवारी (३ ऑगस्ट) पार पडला. या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचा बांगलादेश संघाने २३ धावांनी धुव्वा उडवला आहे. यासह टी-२० मालिकेत त्यांनी १-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात ज्या खेळाडूला मारण्यासाठी मुश्फिकुर रहिमने धाव घेतली होती. त्यानेच ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. संघाच्या एकूण १५ धावा असताना सौम्य सरकार बाद होऊन माघारी परतला होता. बांगलादेश संघाकडून शकिब अल हसनने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली होती. तर मोहम्मद नईमने ३० धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते. २० षटक अखेर बांगलादेश संघाला ७ बाद १३१ धावा करण्यात यश आले होते.(Bangladesh beat australia by 23 runs in first T20I)

प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियन संघाला विजयासाठी फक्त अवघ्या १३२ धावांची आवश्यकता होती. असे वाटत होते की, ऑस्ट्रेलिया संघ हा सामना एकहाती आपल्या नावावर करेल. परंतु बांगलादेश संघातील गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी नांग्या टाकल्या. मिचेल मार्शच्या ४५ धावांच्या खेळी व्यतिरिक्त इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. हा सामना ऑस्ट्रेलियन संघाने २३ धावांनी गमावला.

https://youtu.be/XOLTjumGv7o

नसूम अहमदचा जलवा
काही महिन्यांपूर्वी बांगाबुध टी-२० चषक स्पर्धेत मुश्फिकुर रहीम आणि नसूम अहमद यांच्यातील एक किस्सा भरपूर गाजला होता. संघ सहकारी मुश्फिकुर रहीम हा नसूम अहमदला मारण्यासाठी धावला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. याच खेळाडूने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात विजय मिळवण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्याने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी केली, ज्यामध्ये त्याने केवळ १९ धावा खर्च करत ४ महत्वाचे गडी बाद केले होते.

महत्त्वाच्य बातम्या-

बांगलादेश क्रिकेट संघाची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलियावर मिळवला दणदणीत विजय

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली बनू शकतो ‘विक्रमांचा बादशाह’, वाचा सविस्तर

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी ‘कर्णधार’ कोहलीने केली पुजाराची पाठराखण; म्हणाला, ‘त्याला एकटे सोडून द्या’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---