---Advertisement---

पाकिस्तानला ९ धावांनी धूळ चारत बांगलादेशने साकारला ऐतिहासिक विजय; काय आहे खास, वाचा

On: सोमवार, मार्च 14, 2022 12:30 PM
Bangladesh-Women
---Advertisement---

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वनडे विश्वचषक २०२२ चा (ICC Women ODI World Cup 2022) १२ वा सामना बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान (BAN vs PAK) यांच्यात झाला. या सामन्यात बागंलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर २३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ९ विकेट्स गमावत २२५ धावाच करू शकला. परिणामी बांगलादेशने ९ धावांनी हा सामना खिशात घातला. हा विजय त्यांच्यासाठी ऐतिहासिक (Bangladesh Women Historic Win) ठरला आहे. 

बांगलादेश महिला संघाचा हा वनडे विश्वचषक इतिहासातील पहिलावहिला विजय आहे. यापूर्वी त्यांना विश्वचषकात एकही सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे १४ मार्च २०२२ हा दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय असेल.

सिद्रा अमीनचे शतक व्यर्थ 
बांगलादेशच्या २३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून सलामीवीर सिद्रा अमीन हिने शानदार शतक झळकावले. १४० चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांच्या मदतीने तिने १०४ धावा केल्या. तिच्या साथीला सलामीवीर नहीदा खान हिनेही ४३ धावा जोडल्या. परंतु पाकिस्तानच्या इतर फलंदाज विशेष खेळी करू शकल्या नाहीत. त्यांच्या मधल्या फळीतील ३ फलंदाज शून्यावर बाद झाल्या. तर ३ फलंदाज एकेरी धावेवर बाद झाल्यामुळे पाकिस्तानच्या संघाला हातातोंडाशी आलेला सामना गमवावा लागला.

या डावात बांगलादेशकडून फहिमा खातून हिने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ८ षटके गोलंदाजी करताना ३८ धावा देत तिने पाकिस्तानच्या ३ फलंदाजांना तंबूत धाडले. तसेच रुमाना अहमद हिनेही २ विकेट्सचे योगदान देत पाकिस्तानला २२५ धावांवर रोखण्यात हातभार लावला.

बांगलादेशकडून ३ फलंदाजांच्या मोठ्या खेळी
तत्पूर्वी बांगलादेशकडून प्रथम फलंदाजी करताना फरगाना हौकी हिने सर्वाधिक ७१ धावा फटकावल्या. ११५ चेंडूंचा सामना करताना ५ चौकारांच्या मदतीने तिने ही खेळी केली. तसेच कर्णधार निगर सुल्ताना हिने ४६ धावा आणि सलामीवीर शरमीन अख्तर हिने ४४ धावा जोडल्या. त्यांच्या या मोठ्या खेळींच्या योगदानामुळे बांगलादेशचा संघ पाकिस्तानचा २३५ धावांचे आव्हान देऊ शकला होता.

या डावात पाकिस्तानकडून नाशरा संधू हिने सर्वाधिक ३ विकेट्स काढल्या होत्या. तिच्याबरोबर फातिमा सना, निदा डार आणि ओमाईमा सोहेल यांनीही प्रत्येकी एका विकेटचे योगदान दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

कोलकाता टेस्ट: अनेकांच्या लॅपटॉपमध्ये कायमची सेव्ह झालेली ती एक इनिंग

केवळ कपिल देवच नाही तर वेगवान अर्धशतकामुळे धोनीवरही वरचढ ठरलाय पंत, १६ वर्षांच्या विक्रमाला तडा

राजस्थान रॉयल्सच्या युवा फलंदाजाला बनायचंय ‘ज्यूनियर युवराज’, वाचा ‘पावर हिटर’ची पूर्ण प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---