---Advertisement---

भारताविरुद्धच्या सामन्याआधीच बांगलादेश मोठा धक्का, ‘हा’ मॅच विनर खेळाडू होणार सामन्यातून बाहेर?

On: मंगळवार, ऑक्टोबर 17, 2023 4:23 PM
Shakib Al Hasan (Bangladesh)
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकात दाखवत असलेला फॅार्म बांगलादेश आणि इतर संघांना धडकी भरवणारा आहे. भारत आणि बांगालदेश यांच्यात गुरुवारी (19 ऑक्टोबर) पुण्यामध्ये आमना सामना होताणार आहे. या सामन्याआधीच बांगलादेश संघाचा घाम निघाला आहे. मात्र, त्यामागचे कारण केवळ भारतीय संघाचे चांगले प्रदर्शन हे नाहीये. भारताविरुद्ध खेळण्याआधी बांगलादेशचा प्रमुख क्रिकेटपटू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे.  

खेळाडूचा खेळ बोलतो आणि जर सर्व खेळाडूंनी एकत्रित कामगिरी करण्यास सुरुवात केली तर संघाचा दबदबा दिसून येतो. 2023 च्या विश्वचषकात भारतीय संघाचा दबदबा दिसत आहे. भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेले तिन्ही सामने जिंकले आहेत. तिन्ही सामन्यांमध्ये भारताच्या विजयाचे नायक वेगवेगळे खेळाडू ठरले आहेत. मात्र, यामुळे बांगलादेशला घाम फुटला आहे, असा विचार तुम्ही करत असाल तर तुम्ही थोडे चुकीचे आहात. त्यांचं टेन्शन वाढवण्याचे हेही कारण असू शकते पण पहिले आणि सर्वात मोठे कारण म्हणजे शाकिब अल हसनची (Shakib Al Hasan) याला झालेली दुखापत.

चेन्नईत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनला भारताविरुद्ध खेळणे कठीण जात आहे. आणि, या सस्पेन्समुळे बांगलादेश संघाची चिंता वाढली आहे. न्यूझीलंडविरुद्ध धावाताना शाकिबला दुखापत झाली. मात्र, दुखापतीनंतरही त्याने फलंदाजी सुरू ठेवली. त्याने 10 षटकेही टाकली. दरम्यान, तो वेदनेशी झुंजतानाही दिसला. मात्र, सामना संपल्यानंतर चेन्नईत त्याचे स्कॅनिंग करण्यात आले, त्यातून त्याच्या दुखापतीचे गांभीर्य स्पष्ट झाले आहे.

आता बांगलादेशचा पुढचा सामना 19 ऑक्टोबरला भारताविरुद्ध खेळायचा आहे. बांगलादेश संघाचे संचालक खालिद महमूद म्हणाले की, “आतापर्यंत शाकिबला जास्त त्रास झाला नाही. मात्र, पुण्यातील सराव सत्रात त्याच्यावर बारकाईने नजर ठेवली जाईल. महमूदने सांगितले की, शाकिबच्या दुखापतीत सुधारणा होत आहे. तसेच तो धावतही आहे. मात्र, अंतिम निर्णय आम्ही पुण्यात घेऊ. तो भारताविरुद्ध खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल अशी आम्हाला आशा आहे.”

बांगलादेश संघाचे संचालक पुढे म्हणाले की, “शाकिबला खेळायचे आहे. दुखापतीनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो जसा 85 ते 90 टक्के तंदुरुस्त होता, तशी परिस्थिती असेल, तर आपण त्याच्याकडून खेळण्याची अपेक्षा करू शकतो. मात्र, तो 100 टक्के फिट आहे की नाही यावर सर्व काही अवलंबून असेल. कारण आपण जोखीम घेऊ शकत नाही. आम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण विश्वचषक 2023 मध्ये अजून 6 सामने बाकी आहेत. त्यामुळे आम्हाला घाई करायची नाही. कारण आम्हाला त्याला संपूर्ण स्पर्धेत खेळवायचे आहे. शाकिब भारताविरुद्ध खेळण्याचा अंतिम निर्णय संघाचे फिजिओ आणि डॉक्टर घेतील.”

विश्वचषक 2023 मध्ये दोन्ही संघांनी 3-3 सामने खेळले आहेत. भारताने तिन्ही सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशने एका सामन्यात विजय मिळवला आहे. भारत आपला विजयरथ कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल तर बांगलादेश आपल्या दुसऱ्या विजयाच्या प्रयत्नात असेल. (Bangladesh big shock before the match against India this match winner player will be out of the match)

महत्वाच्या बातम्या – 
पंजाबने घातला SMAT मध्ये धावांचा अभिषेक! आंध्रविरुद्ध ठोकल्या तब्बल ‘इतक्या’ धावा
SAvNED: दक्षिण आफ्रिकेचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, असे आहेत दोन्ही संघ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---