यंदाच्या विश्वचषकात सुपर 8 मधील पहिल्या गटात भारत, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघांचा समावेश आहे. या गटात भारत आणि ऑस्ट्रेलियाने सुपर-8 मधील पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. तर बांग्लादेश आणि अफगाणिस्तानचा पराभव झाला आहे. आता सुपर-8 मधील टीम इंडियाचा दुसरा सामना 22 जून रोजी भारत विरुद्ध बांग्लादेश सामना होणार आहे. या दरम्यान बांग्लादेश क्रिकेट बाोर्डने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. बांग्लादेशने 2004 साली भारताविरुद्धचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना जिंकलेल्याचा व्हिडिओ क्लिप शेअर केला आहे.
बांग्लादेश क्रिकेट बाोर्डने आपल्या अधिकृत x खात्यांवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. 2004 साली बांग्लादेशने भारतीय संघाला पहिल्यांदा हरवले होते. त्या सामन्याचे व्हिडिओ क्लिप बीसीबीने पोस्ट केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 26 डिसेंबर 2004 साली झालेल्या या सामन्यात बांग्लादेशने दिलेल्या 229 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 214 धावांवर सर्वबाद झाला होता. बांग्लादेशने हा समाना 15 धावांनी जिंकला होता. भारताविरुद्ध बांग्लादेशचा हा पहिला विजय मिळवला होता.
From the Archives: First-ever international match victory against India at Bangabandhu National Stadium, Dhaka in 2004#BCB #Cricket #Bangladesh #CricketMemories pic.twitter.com/8qifqP4c3V
— Bangladesh Cricket (@BCBtigers) June 21, 2024
यंदाच्या विश्वचषकात सुपर-8 मधील भारत बांग्लादेश सामन्यापूर्वी बीसीबीने व्हिडिओ शेअर करुन भारतीय संघाला डिवचण्याचं कृत्य केले आहे. तत्तपूर्वी बांग्लादेशने यंदाच्या विश्वचषकात साखळी फेरीत 4 पैकी 3 सामन्यांत विजय मिळवला होते. मात्र सुपर-8 मधील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभव केला आहे. डकवर्थ नियमानूसार कांगारुनी बांग्लादेशला 28 धावांनी मात दिले आहे.
महत्तवाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकात रवींद्र जडेजा बनलाय भारतीय संघाची कमजोरी, आकडेवारी धक्कादायक!
140 कोटी भारतीयांना रडवणारा खेळाडू बनला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द इयर’, रिकी पाँटिंगच्या हस्ते मिळाली ट्रॉफी
पंत, जडेजा, अर्शदीप की अक्षर? अफगाणिस्तान विरुद्ध कोणाला मिळालं ‘बेस्ट फिल्डर’चं मेडल?