बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आणि बांग्लादेशी क्रिकेटपटू सतत काही ना काही कारणाने वादात सापडत असतात. मैदानावरील आणि मैदानाबाहेरील घटनांनी त्यांची सतत चर्चा होत असते. असाच नुकताच एक प्रकार बांग्लादेश मध्ये सुरू असलेल्या ढाका प्रीमियर टी२० लीग दरम्यान समोर आला. या लीग दरम्यान बायो बबलचे उल्लंघन झाल्याचा आरोप झाला होता.
आता आलेल्या वृत्तानुसार बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने या बायो बबलच्या उल्लंघनाची चौकशी सुरू केली आहे. बोर्डासह ढाका महानगर क्रिकेट समितीने देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे समजते आहे. या प्रकरणात बांग्लादेशचा दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसनचे देखील नाव समोर आले आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाला अतिशय गांभीर्याने हाताळले जात असून चौकशीला सुरुवात झाली आहे.
अधिकृत वक्तव्य आले समोर
या प्रकरणाबाबत एक अधिकृत वक्तव्य देखील समोर आले आहे. ढाका महानगर क्रिकेट समितीचे अध्यक्ष यांनी जारी केलेल्या वक्तव्यात म्हंटले आहे की, “आम्ही या घटनेमुळे निराश आहोत. बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आणि ढाका महानगर क्रिकेट समिति या दोघांनीही या घटनेला गांभीर्याने घेतले आहे. आमचे संघ, अधिकारी आणि खेळाडू यांची सुरक्षा आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची आहे. ती जपली जावी यासाठी आम्ही शक्य तितके सगळे प्रयत्न करत आहोत. मात्र तरीही घटना घडली. आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत. चौकशीअंती योग्य ती कारवाई केली जाईल आणि पुन्हा अशी घटना होणार नाही, यासाठी प्रतिबंधक उपाय देखील केले जातील.”
सरावा दरम्यान घडली घटना
एका रिपोर्टनुसार ही घटना शेर-ए-बांग्ला मैदानावर घडली. या मैदानावर बांग्लादेशचा दिग्गज खेळाडू शाकिब अल हसन सराव करत होता. त्यावेळी एका बाहेरील व्यक्तीने मैदानात प्रवेश केला. याबाबत अधिक माहिती मिळाली नसून बोर्डाच्या चौकशीअंती अधिक स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
व्वा रं पठ्ठ्या! क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर पदार्पण करताना कॉनवेने मोडला ३९ वर्षीय जुना विश्वविक्रम
“१३० कोटींच्या देशांत कसोटी खेळणाऱ्या ३०२ खेळाडूंपैकी मी एक”, दिग्गज खेळाडूने व्यक्त केले समाधान
फाफ डू प्लेसिस म्हणतोय, ‘या’बाबतीत आयपीएलपेक्षा सरस आहे पीएसएल