---Advertisement---

Asia Cup 2023: सुपर- 4मधील पहिल्या सामन्यात बांगलादेश ‘टॉस का बॉस’, पाहा दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

PAK-vs-BAN
---Advertisement---

आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात बुधवारी (दि. 06 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. यापूर्वी उभय संघात 2.30 वाजता नाणेफेक झाली. ही नाणेफेक बांगलादेश संघाने जिंकली असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विजय मिळवत दोन्ही संघ आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करतील.

बांगलादेश संघांने सुपर- 4 (Super- 4) फेरीतील पहिल्या सामन्यात आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाहीये. तसेच, पाकिस्तान संघाने या सामन्याच्या एक दिवस आधीच आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली होती.

स्पर्धेतील कामगिरी
सुपर- 4 फेरीतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी संघांच्या साखळी फेरीतील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर पाकिस्तान अ गटात दोनपैकी एक सामना जिंकून 3 गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी राहिला होता. तसेच, भारताविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे एक गुण मिळवत पाकिस्तानने अव्वलस्थान पटकावले होते.

दुसरीकडे, बांगलादेश संघ ब गटात असून त्यांनी खेळलेल्या 2 सामन्यांपैकी 1 सामना जिंकला, तर त्यांना 1 सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी राहिल्यामुळे त्यांनी सुपर-4 फेरीत प्रवेश केला.

पाकिस्तान संघ
फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रौफ

बांगलादेश संघ
मोहम्मद नईम, मेहिदी हसन मिराझ, लिटन दास, तौहिद हृदोय, शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), शमीम हुसेन, अफिफ हुसैन, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद (Bangladesh have won the toss and have opted to bat Asia Cup 2023 Super 4 First Match PAK vs BAN)

हेही वाचाच-
नाद केला पण पुरा केला! 2023मध्ये कर्णधार म्हणून ‘अशी’ जबरदस्त कामगिरी एकट्या रोहितलाच जमली, वाचाच
‘स्विंग किंग’ भुवीचे टीम इंडियातील पुनरागमनावर लक्षवेधी भाष्य; म्हणाला, ‘मला फरक पडत नाही आणि मी…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---