कोलंबो। आज भारत विरुद्ध बांग्लादेश संघात निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेतील साखळी फेरीचा सामना रंगणार आहे. या सामन्यात बांग्लादेश संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात भारताला विजय मिळवून अंतिम फेरीतील स्थान पक्के करण्याची संधी आहे तर बांग्लादेशला आघाडी मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये विजयासाठी चुरस बघायला मिळण्याची चाहत्यांची अपेक्षा आहे.
सध्या भारतीय संघ गुणतालिकेत दोन विजयांसह अव्वल स्थानी आहे. तर बांग्लादेश नेट रनरेट कमी असल्याने शेवटच्या स्थानी आहे.
आजच्या सामन्यासाठी ११ जणांच्या भारतीय संघात जयदेव उनाडकट ऐवजी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आलेली आहे. हा एकमेव बदल आज भारतीय संघात झाला आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ:
भारत: रोहीत शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), केएल राहूल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वाॅशीगंटन सुंदर, य़ुझवेंद्र चहल, विजय शंकर, शार्दल ठाकूर, मोहंमद सीराज,
बांग्लादेश: महमुदूल्लाह रीयाद( कर्णधार), तमिम इक्बाल, लिटोन दास, सौम्या सरकार, मुशफिकूर रहीम,सब्बीर रहमान, मेहेदी हसन मिराज, अबू हैदर रोनी, रूबेल हुसेन, मुस्तफिजूर रहमान, नाझमुल इस्लाम