सध्या भारत आणि बांगलादेश या संघात पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे सुरु आहे. शनिवारी (दि. 17 डिसेंबर) या सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ संपला. चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशने 6 बाद 272 धावा केल्या. बांगलादेशसाठी झाकीर खान याने झंझावती शतक झळकावले आणि सलामीवीर नजमुल शंटो याने 67 धावा केल्या.
तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात झाली तेव्हा बांगलादेशने बिनबाद 42 धावांवर होता. त्यानंतर बांगलादेशच्या सलामीवीरांनी धमाकेदार खेळी करत संघाला शतकीय सलामी धावसंख्या धावफलकावर लावण्यात मदत केली. बांगलादेशला पहिला झटका नजमुल हसन शंटो (Najmul Hasan Shanto) याच्या रुपात लागला. तो वैयक्तिक 67 धावा करत उमेश यादव (Umesh Yadav) याच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर बांगलादेशचे ठराविक अंतराने गडी बाद होत गेले. त्यानंतर कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने डाव सांभाळला आणि शेवटच्या सत्रात सांभाळून फलंदाजी केली. बांगलादेशला पाचव्या दिवशी जिंकण्यासाठी 241 धावांची गरज आह आणि हातात 4 विकेट शिल्लक आहे. भारतासाठी अक्शर पटेल याने 27 षटकात 50 धावा देत 3 गडी बाद केले. त्याचबरोबर उमेश यादव, आर अश्विन (R. Ashwin) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.
भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत 404 धावा केेल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला बांगलादेश संघ 150 धावांवर गारद झाला. बांगलादेशच्या या डावात भारताच्या कुलदीप यादव याने 5 विकेट हॉल घेतला. तर मोहम्मद सिराज याने गडी बाद केले.
पहिल्या कसोटी सामन्यावर भारताची पकड मजबूत आहे. भारतासाठी बाांगलादेश विरुद्धचे दोनही सामने जिंकणे खूप महत्वाचे आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद या स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी भारतीय संघाने बांगलादेश विरुद्धचे दोन सामने आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचे 4 सामनेे कुठल्याही परिस्थितीत जिंकावे लागतील.(Bangladesh is playing on 272 for 6 till stumps of the fourth day and now they need 371 runs to win)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार स्टोक्सवर प्रशिक्षक मॅक्युलम भारी! सिक्स हिटिंग चॅलेंजमध्ये दाखवून दिली पॉवर
आयसीसीसोबतचा ‘हा’ वाद भारताला महागात पडणार! विश्वचषकाच्या यजमानपदासाठी मोजावे लागणार 900 कोटी