---Advertisement---

बांगलादेशच्या अडचणीत वाढ, अव्वल फलंदाजाची ‘या’ कारणामुळे टी२० विश्वचषकातून माघार

On: बुधवार, सप्टेंबर 1, 2021 10:30 PM
Tamim-Iqbal
---Advertisement---

टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी अवघे काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. अशात प्रत्येक संघ आपल्या महत्वाच्या खेळाडूंना घेऊन स्पर्धेसाठी संघ बांधण्याची तयारी करत आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाने तर त्यांचा १५ सदस्यीय संघ देखील जाहीर केला आहे. मात्र टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी बांगलादेशसाठी आता वाईट बातमी समोर येत आहे. बांगलादेशचा सलामीचा फलंदाज तमिम इक्बालने स्पर्धेपूर्वी आपले नाव मागे घेतले आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, तमिमने बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या मुख्य निवडकर्ते आणि बोर्डाचे अध्यक्ष नजमूल हसन पपोनला याबाबत माहिती दिली. ज्यामध्ये तमिमने आगामी टी-२० विश्‍वचषक स्पर्धेतून नाव मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. तमिमने याबाबत एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये तो म्हणाला, “मी गेल्या १५ ते २० टी-२० सामन्यांमध्ये खेळलो नाही. अशात इतर कोणत्या खेळाडूऐवजी मला संघात खेळणे माझ्या मते हे योग्य नाही.”

तमिम गेल्या काही काळापासून गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. तो मागील बऱ्याच मालिकांमध्ये देखील संघात उपलब्ध नव्हता. त्याच्या या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याने झिंबाब्वे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतून आपले नाव मागे घेतले होते.

तमिम इक्बाल हा बांगलादेशचा एक महत्त्वाचा आणि अनुभवी खेळाडू आहे. तमिम हा बांगलादेशकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत २४ च्या सरासरीने तब्बल १७०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट ११६ एवढा राहिला आहे. यामध्ये त्याने १ शतक आणि ७ अर्धशतके देखील लगावले आहेत.

दरम्यान, बांगलादेशला टी-२० विश्वचषक स्पर्धेत सुपर १२ मध्ये खेळण्यासाठी आधी पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. यामध्ये जर बांगलादेशचा संघ सुपर १२ साठी पात्र ठरला, तर आयसीसीने नेमून दिलेल्या अ किंवा ब गटात त्याचा समावेश होऊ शकतो. टी-२० विश्वचषक स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये ऑक्टोंबर-नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या –
‘पोलार्ड अनस्टॉपेबल’! ताबडतोब खेळीसह टी२०त रचला इतिहास, गाठला ‘इतक्या’ हजार धावांचा पल्ला
कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा यष्टीरक्षक, ज्याच्या साधे २० सामनेही नाहीत आले नशीबी
हसला, भोवती चक्कर मारली, खूप उकसावलं; मग पोलार्डने केलं असं काही की पाकिस्तान गोलंदाज निरुत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---