सध्या कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) सुरू आहे. या स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. या दरम्यान मंगळवारी (३१ ऑगस्ट) झालेल्या एका सामन्यात त्रिनबागो नाईट रायडर्सने सेंट लुसिया किंग्ज संघाचा २७ धावांनी पराभव केला. त्रिनबागो नाईट रायडर्सचा कर्णधार कायरन पोलार्डने या सामन्यात दमदार खेळी करत २९ चेंडूत ४१ धावा केल्या आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. याच दरम्यान पोलार्डने एक अनोखा विश्वविक्रम देखील आपल्या नावे केला. असा करणारा तो जगातला केवळ दुसराच खेळाडू ठरला.
या सामन्यात पोलार्डने ४१ धावांची खेळी केली. यासह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये तब्बल ११००० धावांचा टप्पा पार केला आहे. असा करणारा तो त्याचाच संघसहकारी ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलनंतर जगातला दुसराच फलंदाज आहे. त्यामुळे पोलार्डचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. तसेच असेही काही खेळाडू आहेत, जे लवकरच हा टप्पा पार करू शकतात. तर पाहुयात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज कोण आहेत?
ख्रिस गेल –
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गेलच्या नावे आहे. ज्याने तब्बल १४००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. म्हणून त्याला ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून देखील संबोधले जाते. गेलने आतापर्यंत ४३८ सामन्यांमध्ये ४३० डावात तब्बल १४,१०८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये गेलने २२ शतकांतसह ८७ अर्धशतक लगावले आहेत. गेलच्या या अवाढव्य विक्रमाजवळ देखील कोणता खेळाडू नाही.
कायरन पोलार्ड –
टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पोलार्डने ११,००० धावांचा टप्पा पार करत दुसरा क्रमांक गाठले आहे. असा करणारा तो दुसरा वेस्ट इंडिजचा खेळाडू तर ठरलाच, मात्र असा करणारा जगातला देखील तो दुसरा खेळाडू ठरला. पोलाडने आतापर्यंत ५५४ सामन्यांमध्ये ४९१ डावात तब्बल ११,००८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १ शतक आणि ५५ अर्धशतकांचा समावेश आहे.
शोएब मलिक –
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू शोएब मलिक या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मलिकने अनेक टी-२० स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. ज्यामध्ये त्याने चांगली खेळी करत तब्बल १०,७४८ धावा केल्या आहेत. मलिकने आतापर्यंत खेळलेल्या ४२८ सामन्यातील ३९९ डावात हा धावांचा डोंगर उभा केला आहे. ज्यामध्ये त्याने तब्बल ६६ अर्धशतके लगावले आहेत.
डेविड वॉर्नर –
या यादीत ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर चौथ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने टी-२० क्रिकेटमध्ये ३०४ सामन्यातील ३०३ डावात १०,०१७ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये वॉर्नरने ८ शतक आणि ८२ अर्धशतके लगावले आहेत. वॉर्नर आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतो. या स्पर्धेतही वॉर्नरने धावांचा आपला चांगलाच दबदबा कायम केला आहे.
विराट कोहली –
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ५ शतक आणि ७२ अर्धशतकांच्या मदतीने तब्बल ९९२९ धावा केल्या आहेत. यासह टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत कोहली पाचव्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या –
–हसला, भोवती चक्कर मारली, खूप उकसावलं; मग पोलार्डने केलं असं काही की पाकिस्तान गोलंदाज निरुत्तर
–बांगलादेशचे गोलंदाज ‘किवीं’वर पडले भारी; पहिल्या टी२०त ७ विकेट्सने उडवला धुव्वा
–बांगलादेशपुढे न्यूझीलंडचे फलंदाज निष्प्रभ, ९ जण एकेरी धावसंख्येवर बाद; टी२०तील नकोसा विक्रम नावे