---Advertisement---

साजिद खानने बांगलादेशी फलंदाजांची पळता भुई थोडी, पाकिस्तानचा दुसरी कसोटी जिंकत मालिकेवर कब्जा

On: बुधवार, डिसेंबर 8, 2021 6:27 PM
Pakistan
---Advertisement---

बांग्लादेशच्या शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर (Shere Bangla Stadium) बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालकेतील (Bangladesh vs Pakistan Test Series) दुसरा सामना झाला. हा सामना पाकिस्तानने एक डाव आणि ८ धावांनी जिंकला. पाकिस्तानच्या या विजयात साजिद खानने (Sajid Khan) मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४ बाद ३०० धावांवर पहिला डाव घोषित केला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ७६ धावा केल्या. त्याच्याशिवाय अझर अली (५६) फवाद आलम (५०) आणि मोहम्मद रिझवान (५३) यांनी अर्धशतके केली.

साजिद खानची टिच्चून गोलंदाजी 
पाकिस्तानने ३०० धावांवर डाव घोषित केल्यानंतर बांगलादेश संघ फलंदाजीसाठी उतरला.  मात्र, बांगलादेशचा पहिला डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. बांगलादेश संघ ३२ षटकांत ८७ धावांत सर्वबाद झाला. बांगलादेशकडून केवळ नजमुल हुसेन शांतो (३०) आणि शाकिब अल हसन (३३) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. अन्य फलंदाज १० धावांचा आकडाही पार करू शकले नाहीत. पाकिस्तानकडून साजिद खानने १५ षटकांत ४२ धावा देत ८ विकेट्स घेतल्या.

बांगलादेशचा पहिला डाव ८७ धावांवर संपुष्टात आल्याने पाकिस्तानने २१३ धावांची मजबूत आघाडी घेतली. तसेच बांगलादेशला फॉलोऑन दिला.

दुसऱ्या डावातही साजिदच्या गोलंदाजीची कमाल
फॉलोऑननंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या बांगलादेशने दुसऱ्या डावात पहिल्या डावापेक्षा चांगली फलंदाजी केली, मात्र त्यांना सामना वाचवण्यात यश मिळाले नाही. बांगलादेशचा दुसरा डाव ८४.४ षटकांत २०५ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे पाकिस्तानने सामना जिंकत मालिकाही जिंकली.

बांगलादेशकडून दुसऱ्या डावातही शाकिब अल हसनने झुंज दिली. त्याने ६३ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त मुशफिकूर रहिमने ४८ आणि लिटॉन दासने ४५ धावांचे योगदान दिले. मात्र, अन्य फलंदाजांना फार काही करता आले नाही. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावातही साजिद खानने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त शाहिन आफ्रिदी आणि हसन अलीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर बाबर आझमने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

Video: ऍशेसच्या पहिल्याच चेंडूवर पडली विकेट, ८५ वर्षांनंतर अद्वितीय विक्रम घडताना पाहून समालोचकही थक्क

पराभवानंतरही किवी कर्णधाराने गायले भारतीय संघाचे गुणगान, विलियमसन म्हणाला, ‘बलाढ्य संघाविरुद्ध खेळणे…’

डिट्टो ‘गब्बर’सारखे सेलिब्रेशन करतो पाकिस्तानचा ‘हा’ बॉलर, १२ विकेट्स चटकावत आणलेय बांगलादेशला नाकी नऊ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---