भारत आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघांतील टी-20 मालिका गुरुवारी (13 जुलै) संपली. मालिकेतील तिसरा सामना देखील मिरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला गेला आणि भारताला या सामन्यात 4 विकेट्सने पराभव स्वाकारावा लागला. बांगलादेशच्या विजयात शामिमा सुलताना आणि राबिया खान यांचे योगदान सर्वाधिक राहिले.
भारतीय संघ तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची वनडे मलिका खेळण्यासाठी बांगलादेश दौऱ्यावर आला आहे. उभय संघांतील तिसरा टी-20 सामना यजमान बांगलादेशने जिंकला, पण मालिका मात्र भारताच्या खिशात गेली. भारतीय संघाने टी-20 मालिकेतील पहिले दोन्ही सामने अनुक्रमे 7 विकेट्स आणि 8 धावांनी जिंकले असून मालिकाही आधीच जिंकली होती. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे तिसरा सामना देखील कमी धावसंख्येचा राहिला. प्रथम फलंदाजी करताना भारततीय संघ 9 बाद 102 धावा करू शकला. प्रत्युत्तरात बांगलादेशने हे लक्ष्य 18.2 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर गाठले.
दरम्यान, बांगलादेश महिला संघाकडून मायदेशातील टी-20 सामन्यात भारताला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत उभय संघात बांगलादेशमध्ये एकूण 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. मालिकेतील या तिसऱ्या सामन्यात जर भारताने विजय मिळवला असता, तर यजमान बांगलादेशला व्हाईट वॉश (0-3 ने पराभव) मिळाला असता. पण त्यांच्या सुदैवाने असे झाले नाही. भारतीय फलंदाज पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे याहीवेळी अपयशी ठरल्या. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर मात्र 40 धावांची सर्वात्तम खेळी करू शकला. स्मृती मंधाना 1 धाव संघाची पहिली विकेट ठरली. तर तिच्या साधीने सलामीला आलेली शेफाली वर्मा 11 धावा करून बाद झाला. राबिया खान हिने 4 षटकात 16 धावा देत भारताच्या सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच सुलताना खातूम हिने 4 षटकात 17 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.
बांगलादेशसाठी सलामीवीर शामिमा सुलताना हिने 42 धावांची सर्वोत्तम खेळी केली. भारतासाठी मिन्नू मणी आणि देविका विद्या यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. उभय संघांतील ही टी-20 मालिका संपल्यानंतर दोन्ही संघ रविवारपासून (16 जुलै) तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहेत. वनडे मालिकेतील तिन्ही सामने मिरपूरमध्येच आयोजित केले गेले आहेत
(Bangladesh Women defeated India Women by 4 wickets to avoid a 0-3 whitewash)
बातमी अपडेट होत आहे…
…म्हणून गिलला करायचीये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी, स्वत:च केलाय खुलासा; एक नजर टाकाच
वनडे क्रिकेटचं भविष्य धोक्यात! 2027नंतर द्विपक्षीय मालिका होण्याची शक्यता कमीच