---Advertisement---

‘विराट जेव्हा त्यांना भिडत होता तेव्हा मी…’, मोहम्मद सिराजची रिऍक्शन आली समोर

Mohammed Siraj & Virat Kohli
---Advertisement---

बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला गेला. ढाकामध्ये झालेल्या या सामन्यात भारताने रविवारी (25 डिसेंबर) 3 विकेट्सने विजय मिळवला. हा सामना अनेक कारणामुळे लक्षात राहणार आहे. यातील महत्वाचे आणि अतिशय गाजलेला प्रकार म्हणजे विराट कोहली-बांगलादेशी खेळाडू वाद. हा प्रकार भारताच्या दुसऱ्या डावात घडला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यावर मोहम्मद सिराज याची प्रतिक्रिया पुढे आली आहे.

ही घटना भारताच्या दुसऱ्या डावात 20व्या षटकात घडली. तेव्हा भारतीय संघ 3 विकेट्स गमावत कठीण स्थितीत होता आणि भारताला आणखी एक विकेट गमावून अडचण वाढवायची नव्हती. म्हणून विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या रणनीतीनुसार खेळत होता. तेव्हा मेहदी हसन मिराजने टाकलेला चेडू त्याच्या बॅटची कड घेऊन मोमिनुल हकच्या हातात गेला. बाद होताच विराटला काही बांगलादेशी खेळाडूंनी शिवीगाळ केली. ते शब्द ऐकताच विराटचा राग अनावर झाला होता,

हा मुद्दा जेव्हा पत्रकार परिषदेत आला. तेव्हा त्याच्याशी संबंधित प्रश्न सिराजला विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना सिराजने म्हटले, “मी खरचं सांगतो मी तेव्हा आईस बाथ घेत होतो. मला काहीच नाही माहित. आता त्याबाबत अधिक विचार करणे आवश्यक नाही. या सामन्यात एका खेळाडूने मोठी खेळी करणे गरजेचे आहे.”

या सामन्यात भारताला विजयासाठी 145 एवढे सोपे लक्ष्य मिळाले होते, मात्र यजमानांनी ज्याप्रकारे गोलंदाजी केली त्यामुळे भारताची स्थिती कठीण झाली होती. दुसऱ्या डावात भारताने पहिल्या चार विकेट्स 37 धावसंख्येवरच गमावल्या होत्या. चौथी विकेट विराटची होती. तो केवळ एकच धाव करत बाद झाला. या मालिकेत पाहिले तर त्याला उत्तम खेळी करता आली नाही.

दुसऱ्या सामन्याच्या विजयात आर अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी महत्वाची भुमिका पार पाडली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी नाबाद 71 धावांची भागीदारी केली होती. ज्यामुळे भारताला दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकता आली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय दिग्गजाच्या शब्दांनी बदलले जम्मूच्या विवरांतचे आयुष्य; आज आयपीएलमध्ये कमावलेत अडीच कोटी
श्रेयस- अश्विनचा भीमपराक्रम, थेट 90 वर्ष जुन्या विक्रमाशी केली बरोबरी 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---