---Advertisement---

क्या बात! आयर्लंडच्या १०व्या आणि ११व्या क्रमांकावरील फलंदाजांनी चिवट झुंज देत केला ‘हा’ विश्वविक्रम

On: मंगळवार, जुलै 20, 2021 1:46 PM
---Advertisement---

वनडे मालिका १-१ ने बरोबरीत सुटल्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. सोमवारी (१९ जुलै) या मालिकेतील पहिला टी-२० सामना पार पडला, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका संघाने ३३ धावांनी विजय मिळवला आहे. यासह ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. हा सामना दक्षिण आफ्रिका संघाने जिंकला असला तरीही शेवटी आयर्लंड संघाच्या फलंदाजांनी जे केले त्याने सर्वांचेच मन जिंकले आहे.

या सामन्यात आयर्लंड संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघाकडून एडन मारक्रमने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली होती. तर डेविड मिलरने २८ धावांचे योगदान दिले होते. तर रासी वान दर दुसेनने २५ धावांची खेळी केली होती. २० षटकअखेर दक्षिण आफ्रिका संघाला ७ बाद १६५ धावा करण्यात यश आले होते. (Barry McCarthy and Joshua little won hearts by building last wicket partnership against South Africa)

आयर्लंड संघाचे फलंदाज ठरले फ्लॉप 
धावांचा पाठलाग करण्यासाठी असलेल्या आयर्लंड संघाला दुसऱ्याच चेंडूवर मोठा धक्का बसला होता. जॉर्ज लिंडेने पॉल स्टरलिंगला माघारी धाडले होते. त्यानंतर आयर्लंड संघातील फलंदाज एका पाठोपाठ एक माघारी परतले होते. संघाची धावसंख्या ८८ असताना ९ गडी बाद झाले होते. आयर्लंड संघाकडून हॅरी टेक्टरने ३६ धावांची खेळी केली होती. तर बॅरी मॅक्कार्टीने नाबाद ३० धावांची खेळी केली होती. दक्षिण आफ्रिका संघाकडून तबरेज शम्सीने सर्वाधिक ४ गडी बाद केले. हा सामना दक्षिण आफ्रिका संघाने ३३ धावांनी आपल्या नावावर केला.

तळातील फलंदाजांनी केला खास विक्रम
आयर्लंड संघाचा ९ वा गडी १४ व्या षटकात बाद झाला होता. त्यावेळी आयर्लंड संघाला विजयासाठी ७८ धावांची आवश्यकता होती. आयर्लंड संघाचा पराभव निश्चित होता. परंतु १० व्या आणि ११ व्या क्रमांकाच्या फलंदाजांनी शेवटच्या चेंडूपर्यंत लढत दिली. दोघांनी मिळून शेवटच्या चेंडूपर्यंत फलंदाजी केली. या दरम्यान बॅरी मॅक्कार्टीने २५ चेंडुंमध्ये ४ चौकारांच्या साहाय्याने ३० धावांची खेळी केली. तर जोश लिटीलने १८ चेंडुंमध्ये १ षटकाराच्या साहाय्याने १५ धावांची खेळी केली. या दोघांमध्ये १० व्या गडीसाठी नाबाद ४४ धावांची भागीदारी केली. या खेळीसह त्यांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. ही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुठल्याही संघाकडून १० व्या गडीसाठी केलेली सर्वात मोठी भागीदारी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय समालोचकानेच लाईव्ह सामन्यात भुवीला म्हटले ‘म्हातारा’, आयपीएलच्या भिडूने घेतला समाचार

भारताला विश्वचषक जिंकून देणारा असा खेळाडू, ज्याला कधीच मिळाले नाही कामगिरीचे श्रेय

सुरेश रैनाच्या काकांची हत्या करणारा आरोपी अखेर ताब्यात, ११ महिन्यांपासून सुरू होता शोध

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---