सध्या अखेरीस आलेल्या २०२१ या वर्षातील अखेरच्या तिमाहीत भारतीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे फेरबदल झाले. विराट कोहली याने सर्वप्रथम टी२० संघाचा स्वेच्छेने राजीनामा दिला. (Virat Kohli Resign From T20 Captancy) तर, रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी टी२० विश्वचषकानंतर मुख्य प्रशिक्षकपद सोडले. शास्त्री यांच्या जागी माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड (Headcoach Rahul Dravid) यांची वर्णी लागली.
यानंतर विराट कोहलीकडून वनडे संघाचे नेतृत्व काढून घेत ते रोहित शर्माकडे देण्यात आले. त्यानंतर आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) संचालकपदी माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (NCA Director VVS Laxman) यांची वर्णी लागली. याचबरोबर भारतीय क्रिकेटमध्ये आता ‘बॅच ऑफ १९९६’ (Batch Of 1996) चा अध्याय खऱ्या अर्थाने सुरू झाला. आता हा ‘बॅच ऑफ १९९६’ नक्की आहे तरी काय याबाबत आपण जाणून घेऊया.
बॅच ऑफ १९९६
लक्ष्मण यांनी सोमवारी (१३ डिसेंबर) बेंगलोरस्थित एनसीएचा पदभार स्वीकारला. द्रविड यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर, हे पद रिक्त होते. लक्ष्मण यांच्या येण्याने भारतीय क्रिकेटमधील सहा महत्वपूर्ण पदे आता १९९६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या हाती गेली आहेत.
सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) यांनी १९९६ च्या इंग्लंड दौऱ्यावर लॉर्ड्स कसोटीतून कसोटी पदार्पण केलेले. त्यांनी दिमाखदार शतक झळकावत ही कसोटी अजरामर करून ठेवली आहे. (Sourav Ganguly Lords Hundred) त्याच कसोटीतून पदार्पण करणार्या द्रविड यांच्या हाती आता भारताच्या वरिष्ठ संघाचे सुकाणू आहेत.
गांगुली व द्रविड यांच्याप्रमाणेच सन १९९६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबाद येथे कसोटी पदार्पण करणारे लक्ष्मण आता एनसीएमध्ये युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसतील.
या तीन दिग्गजांव्यतिरिक्त १९९६ च्या त्या ऐतिहासिक इंग्लंड दौऱ्यावर बर्मिंघम कसोटीतून पदार्पण करणारे फिरकी गोलंदाज सुनील जोशी (Chief Selector Sunil Joshi) सध्या भारतीय निवड समितीचे प्रमुख आहे. त्याच कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणारे वेगवान गोलंदाज पारस म्हांब्रे (Bowling Coach Paras Mhambrey) हे द्रविड यांचे सहाय्यक बनवून गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडतील. या दौऱ्यावर एजबॅस्टन कसोटीतून विक्रम राठोड (Batting Coach Vikram Rathore) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा केला होता. आज त्यांच्याकडे भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी आहे.
‘बॅच ऑफ १९९६’ या नावाने ओळखले जाणारे हे सर्व दिग्गज आता आपल्या कारकीर्दीची दुसरी इनिंग सुरू करत आहेत. भारतीय क्रिकेटचे सध्याचे असलेले स्थान आणखी वेगळ्या उंचीवर नेण्याचे शिवधनुष्य या सर्वांना पेलावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे २०१३ पासून पडलेला आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ लवकरात लवकर संपवण्यासाठी हे सर्वजण दिवस-रात्र एक करतील, यामध्ये भारतीय प्रेक्षकांना तिळमात्र शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी संघ जाहीर, ‘हे’ खेळाडू दुसऱ्यांदा खेळणार स्पर्धा
“आम्ही प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला”, रोहितने विराटच्या नेतृत्वाचे गायले गुणगान
‘मदीपा’चा बदला! जेव्हा मदन लालने सर विवियन रिचर्ड्सला दिले होते चोख प्रत्युत्तर, वाचा तो किस्सा