---Advertisement---

मोठी बातमी! वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी न्यूझीलंड संघाची घोषणा; विलियम्सनच्या अनुपस्थितीत ‘या’ खेळाडूकडे संघाचे नेतृत्व

On: सोमवार, नोव्हेंबर 16, 2020 10:12 PM
---Advertisement---

या महिन्याच्या शेवटी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी संघांची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात ३ टी२० आणि २ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी२० मालिकेने होणार आहे.

या दौऱ्यासाठी केन विलियम्सन आणि ट्रेंट बोल्टला टी२० संघातून विश्रांती दिली आहे. कारण विलियम्सन आणि बोल्टला कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत टीम साऊदी टी२० संघाचे नेतृत्व करणार आहे.

याव्यतिरिक्त डेव्हन कॉनवेला आणि काईल जेमीसन यांना पहिल्यांदाच टी२० संघात संधी दिली आहे.

साऊदी, जेमीसन आणि रॉस टेलर हे खेळाडू केवळ पहिल्या २ टी२० सामन्यांसाठी उपलब्ध असतील.

असे असतील सामने
पहिला टी२० सामना २७ नोव्हेंबर रोजी ऑकलँड येथे होणार आहे, तर दुसरा टी२० सामना २९ नोव्हेंबर रोजी माऊंट माउंगनुई येथे होणार आहे. यानंतर ३० नोव्हेंबरला माऊंट माउंगनुई येथेच तिसरा टी२० सामना होणार आहे.

यानंतर पहिला कसोटी सामना ३ डिसेंबरला हॅमिल्टन येथे होणार आहे, तर दुसरा कसोटी सामना वेलिंग्टन येथे ११ डिसेंबर रोजी होणार आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी असा असेल न्यूझीलंडचा टी२० संघ

न्यूझीलंडचा टी२० संघ-
टीम साऊदी (कर्णधार), जिमी नीशम, हामिश बेनेट, मिचेल सँटनर, डेव्हन कॉनवे, इश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ग्लेन फिलिप्स, मार्टिन गप्टील, टिम सिफर्ट (यष्टीरक्षक), काईल जेमीसन, रॉस टेलर, डॅरेल मिचेल

न्यूझीलंडचा कसोटी संघ-
केन विलियम्सन (कर्णधार), हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडल, एजाज पटेल, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, कॉलिन डी ग्रँडहोम, रॉस टेलर, नील वॅग्नर, काईल जेमीसन, बीजे वॉटलींग (यष्टीरक्षक), टॉम लॅथम, विल यंग

महत्त्वाच्या बातम्या-

‘असे’ ठरणार कसोटी चॅम्पियनशीपमधील अव्वल दोन संघ; भारतासाठी वाट कठीण

“विराट जागतिक क्रिकेटमधील सामर्थ्यवान खेळाडू”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे पहिल्या ‘डे- नाईट’ टेस्टबाबत मोठे वक्तव्य

ट्रेंडिंग लेख-

‘डेमियन फ्लेमिंग’… पहाट स्वप्न सत्यात उतरलेले पाहिलेला ऑसींचा एकमेव गोलंदाज

‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी

सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---