---Advertisement---

ऐकावे ते नवलचं! मोबाईल फोनमुळे फलंदाज झाला आऊट, मैदानातील अनोख्या प्रसंगाने वेधले लक्ष

On: शुक्रवार, डिसेंबर 3, 2021 1:52 PM
---Advertisement---

क्रिकेट या खेळाच्या नियमांशी आपण सर्वजण परिचित आहोत. या खेळाचे अगदी साधे आणि सोपे असे नियम आहेत. यापैकीच फलंदाजाच्या बाद होण्याच्या पद्धतींमध्ये त्रिफळाचीत, पायचित आणि झेलबाद यांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त कधी-कधी फलंदाज स्वत:च्याच चुकीमुळे हिट विकेट होतो. परंतु कोणता खेळाडू चक्क त्याच्या मोबाईल फोनमुळे बाद झाल्याचे ऐकल्यावर अनेकांना त्यावर विश्वासही बसणार नाही. परंतु एका क्रिकेटच्या सामन्यात ही कधी न ऐकलेली गोष्ट वास्तवात घडली आहे.

त्यातही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर खेळाडूंना लाईव्ह सामन्यात मोबाईल वापरण्यावर सक्त मनाई आहे. फिक्सिंगच्या कारणामुळे हा नियम बनवण्यात आला आहे. मग ही घटना नेमकी घडली कशी? जाणून घेऊया या घटनेबद्दल

ही घटना घडली होती नोव्हेंबर २०१४ मध्ये. त्यावेळी ऑस्ट्रेलियातील एका १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील (Grampians Cricket Association Juniors Under-16 tournament) एका सामन्यादरम्यान हा प्रसंग घडला होता. यूथ क्लब या संघाकडून खेळत असलेल्या मार्कस एलियट या क्रिकेटपटूसोबत ही घटना घडली होती.

यूथ क्लब संघाच्या ३ विकेट्स पडल्यानंतर मार्कस फलंदाजीसाठी आला होता. यावेळी फलंदाजीसाठी मैदानात येत असताना घाईघाईत त्याचा मोबाईल त्याच्या खिशातच राहिला. त्यानंतर फलंदाजी करत असताना अचानक त्याच्या खिशातून मोबाईल बाहेर निघाला आणि तो मागे यष्टीवर जाऊन पडला. यानंतर मैदानी पंचांनीही नियमांनुसार, त्याला हिट विकेट बाद दिले. यावर मार्कसने चुकीने मोबाईल त्याच्या खिशात राहिल्याचे सांगितले. तरीही पंचांनी त्यांचा निर्णय बदलला न बदलल्याने त्याला पव्हेलियनचा रस्ता धरावा लागला.

यूथ क्लबने पहिल्या डावाच्या आधारावर सामन्यातही मारली बाजी
या सामन्यात यूथ क्लबने प्रथम फलंदाजी करताना ३५ षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर १९५ धावा केल्या होत्या. या डावात जेसुआ केलीने नाबाद ५२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान पॉमोनल संघाने ५ विकेट्सवर १३९ धावाच करू शकला होता. त्यामुळे यूथ क्लने एका डावाच्या आघाडीने हा सामना खिशात घातला होता. परंतु मार्कसच्या हिट विकेटमुळे या सामन्याची क्रिकेट इतिहासात नोंद झाली.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा होणार रद्द? वाचा विराटने बीसीसीआयकडे काय केली मागणी

रहाणे-विलियम्सननंतर आले कोहली-लॅथम, २ सामन्यात ४ कर्णधार उतरल्याने १३२ वर्षांपूर्वीच्या ‘या’ विक्रमाची पुनरावृत्ती  

व्वा, काय योग आलाय! भारतीय वंशाचा किवी गोलंदाज जन्मस्थळी खेळणार कसोटी, यापूर्वी ‘या’ खेळाडूबाबत घडलंय असं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---