---Advertisement---

आयपीएल इतिहासातील १० शिलेदार, ज्यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारुन जिंकून दिला सामना; रोहित शर्माने ‘इतक्यांदा’ केला हा कारनामा

On: मंगळवार, मे 18, 2021 7:56 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो. आपण टी२० क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या पावरप्लेच्या षटकांमध्ये चौकार आणि षटकार मारणारे अनेक फलंदाज पाहिले आहेत. परंतु डेथ ओव्हर्स मध्येही चौकार आणि षटकार मारणे तितकेच महत्वाचे असते. शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाज आणि फलंदाज दोघेही दबावामध्ये असतात. त्यामुळे धावा करणे कठीण जाते. आयपीएलस्पर्धेत अनेक फलंदाज आहेत ज्यांनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारत संघाला सामना जिंकून दिला आहे. चला तर पाहूया.

आयपीएल स्पर्धेत शेवटच्या चेंडूवर षटकार मारणाऱ्या फलंदाजांची यादी खूप मोठी आहे. यात रोहित शर्मा, एमएस धोनी, अंबाती रायुडू, निकोलस पुरन यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. या सर्वांनी एक एक वेळा षटकार मारून आपल्या संघाला सामना जिंकून दिला आहे. तर एकमेव रोहित शर्मा असा फलंदाज आहे, ज्याने असा कारनामा ३ वेळेस केला आहे.

आयपीएल स्पर्धेत शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकवून देणारे फलंदाज
१) रोहित शर्मा : ( विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, २००९)
२) रोहित शर्मा 🙁 विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, २०११)
३) अंबाती रायुडू : ( विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स,२०११)
४)रोहित शर्मा : ( विरुद्ध डेक्कन चार्जर्स,२०१२)
५)सौरभ तिवारी 🙁 विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया,२०१२)
६) डिजे ब्रावो : ( विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स,२०१२
७) एमएस धोनी : ( विरुद्ध किंग्ज इलेव्हेन पंजाब, २०१६)
८)मिशेल सेंटनर : ( विरुद्ध राजस्थान रॉयल्स,२०१९)
९)निकोलस पुरन 🙁 विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर,२०२०)
१०) रवींद्र जडेजा : ( विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स,२०२०)

आयपीएल २०२१ स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले होते. तसेच खेळाडूंना देखील कोरोनाची लागण होऊ लागल्याने, बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कमिटीने आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा पुन्हा केव्हा खेळवण्यात येईल, याबाबत कुठलीही माहिती दिली गेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

आनंदाची बातमी! ‘मिस्टर क्रिकेट’ हसीची कोरोनावर यशस्वी मात; सुखरुप पोहचला आपल्या घरी

केकेआरच्या ‘या’ खेळाडूचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह, मायदेशी झाला रवाना

बॉल टॅम्परिंग प्रकरण : बॅनक्रॉफ्टच्या आरोपांवर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या चौकडीने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---