इंडियन प्रीमियर लीग 2023 आपल्या शेवटच्या टप्पात दाखल झाली आहे. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे चार संघ प्लेऑफ फेरीत खेळणार आहेत. यावर्षी आयपीएलमध्ये फलंदाजांसाठी परिस्थिती जरा जास्तच अनुकूल पाहायला मिळाली. लीगमधील बहुतांश सामन्यांमध्ये संघ 200पेक्षा मोठी धावसंख्या करताना दिसले. फलंदाजांनी षटकार आणि चौकारांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. आपण या लेखात आयपीएल 2023च्या लीग स्टेजमध्ये सर्वाधिक षटकार आणि सर्वाधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूंवर निजर टाकणार आहोत.
आयपीएल 2023मध्ये सर्वाधिक चौकार मारणारे पाच खेळाडू
1. यशस्वी जयस्वाल (राजस्थान रॉयल्स) – जशस्वी जयस्वालने आयपीएल 2023च्या लीग स्टेजमधील सर्वच्या सर्व 14 सामने खेळले आहे एकूण 82 चौकार मारले. एका सामन्यात त्याने सर्वाधिक 16 चौकार मारले आहेत.
2. डेवॉन कॉनवे (चेन्नई सुपर किंग्ज) – सीएसकेचा सलामीवीर डेवॉन कॉनवेनेही लीग स्टेजचे सर्व 14 सामने खेळले आणि यात एकूण 585 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एकूण 69 चौकार पाहायला मिळाले. एका सामन्यात 16 चौकार ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
3. डेविड वॉर्नर (दिल्ली कॅपिटल्स) – वॉर्नर यावर्षी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता आणि त्याने लीग स्टेजचे सर्व सामने खेळले. त्याने 14 सामन्यांमध्ये एकूण 516 धावा केल्या आहेत. यादरम्यान वॉर्नरने एकूण 69 चौकार मारले. एका सामन्यात 11 चौकार ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
4. शुबमन गिल (गुजरात टायटन्स) – गिलनेही लीग स्टेजमधील सर्व सामने खेळले आणि आतापर्यंत एकूण 680 धावा केल्या आहेत. त्याने या 14 सामन्यांमध्ये एकूण 67 चौकार मारले आहेत. एका डावात 8 चौकार हे त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन आहे.
5. विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) – आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली यावर्षी आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने लीग स्टेजच्या 14 सामन्यांमध्ये 65 चौकारांच्या मदतीने 639 धावा केल्या आहेत. एका सामन्यात 13 चौकार ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली.
आयपीएल 2023मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज –
1. फाफ डू प्लेसिस (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) – दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फाफ डू प्लेसिस याच्या नेतृत्वात आरसीबीने यावर्षी चांगले प्रदर्शन केले, पण रविवारी (21 मे) त्यांचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. फाफने लीग स्टेजच्या 14 सामन्यांमध्ये तब्बल 730 धावा केल्या आणि सर्वाधिक 36 षटकार मारले. एका सामन्यात 6 षटकार हे त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले.
2. शिबम दुबे (चेन्नई सुपर किंग्ज) – शिबम दुबेने लीग स्टेजच्या 14 सामन्यांमध्ये 385 धावा केल्या आहेत. यात त्याने 33 चौकार मारले असून एका सामन्यात 5 षटकार हे त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले.
3. ग्लेन मॅक्सवेल (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) – ग्लेन मॅक्सवेलने यावर्षी आयपीएलमध्ये 14 सामन्यात एकूण 400 धावा केल्या. एकूण 31 चौकार यादरम्यान मॅक्सवेलच्या बॅटमधून निघाले. एका सामन्यात 8 षटकार ही त्याची सर्वोत्तम आकडेवारी राहिली आहे.
4. रिंकू सिंग (कोलकाता नाईट रायडर्स) – रिंकू सिंग याने आयपीएलच्या लीग स्टेजमध्ये आपली वेगळी छाप सोडली. गुजरात टायनट्सविरुद्धच्या सामन्यात त्याने शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारून केकेआरला विजय मिळवून दिला होता. यावर्षी आयपीएलमध्ये त्याने एकूण 29 षटकार मारले असून 474 धावा केल्या आहेत. एका सामन्यात 7 षटकार ही त्याची सर्वोत्तम आकडेवारी राहिली आहे.
5. ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्ज) – सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने यावर्षीचा आयपीएल हंगामही गाजवला. त्याने 14 सामन्यांमध्ये एकूण 504 धावा केल्या. यात 28 चौकार त्याच्या बॅटमधून निघाले. एका सामन्यात 9 चौकार ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली.
(Batsmen who hit most sixes and fours in IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संतापजनक! आरसीबीच्या पराभवानंतर चाहत्यांनी सोडली पातळी, मॅचविनर गिल अन् त्याच्या बहिणीला केली शिवीगाळ
सूर्याने सांगितली ग्रीनच्या शतकाची कहाणी! म्हणाला, “ती एक धाव म्हणजे…”