एकेकाळी जगभरातील क्रिकेटवर दबदबा असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ २०१५ च्या विश्वचषक विजेता संघ आहे. मायकल क्लार्कच्या नेतृत्वखाली त्यानी ही कामगिरी केली होती. त्या विजयानंतर कर्णधार पदाची जबाबदारी स्टिव्ह स्मिथयाने आपल्या खांदयावर घेतली होती. टी२० विश्वचषक २०१६ मध्ये ऑस्ट्रलिया संघाला तशी चांगली कामगिरी करता आली नव्हती, पण सध्या दोन वेळच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्याना जर यावर्षी चांगली कामगिरी करायची असेल तर मागील सर्व विसरून फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज संघाला आहे.ऑस्ट्रलियाला इंग्लंडमधील वातावरणात मागील काही वर्षात चांगला खेळ करता आलेला नाही. त्याना या वर्षी जर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची असेल तर त्यांना या गोष्टीत बदल करावा लागणार हे नक्की. ऑस्ट्रलियन बोर्ड आणि खेळाडू यांच्यात चाललेला पैशासाठीचा वादाचा खेळावर किती परिणाम होतो हे बघण्यासारखे असेल.
ऑस्ट्रलियाची ताकद
पॉवर हिटर फलंदाज –
ऑस्ट्रलियाकडे वॉर्नर आणि फिंच यांची तडाकेदार फटकेबाजी करणारी सलामीची जोडी आहे. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल सारखा मैदानाच्या कोणत्याही बाजूस सहज फटके मरणारा फलंदाज आहे. तर बिग बॅश आणि आयपीएलमध्ये उत्कृष्ट फलंदाजीकरून आपली लय क्रिस लिननेही दाखूवन दिली आहे.
वेगवान गोलंदाजी-
मिचेल स्ट्रेचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रलियाची वेगवान गोलंदाजी कागदावर तरी खूपच घातक दिसत आहे. पट्टीसोन,कमिन्स आणि हॅझेलवूड या सर्व गोलंदाजांना इंग्लंडच्या वातावरणात सुरेख गोलंदाजीकरून ऑस्ट्रलियाला ट्रॉफी जिंकून देण्याची सुवर्ण संधी आहे.
ऑस्ट्रलियन संघातील कमतरता
फिरकी गोलंदाजांची कमी –
ऍडम झाम्पा हा एकमवे स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज ऑस्ट्रलियाच्या संघात आहे. ग्लेन मॅक्सवेलने जरी वेळोवेळी चांगली गोलंदाजी करून संघात आपली अष्टपैलू खेळाडू म्हणून जागा मिळवली असली तरी ऑस्ट्रलियाला आजून एका फिरकी गोलंदाजांची कमी जाणवेल हे नक्की.
इंग्लंडमधील ऑस्ट्रलियान फलंदाजांचा इतिहास –
ऑस्ट्रलियाचा सलामीचा फलंदाज वॉर्नरला इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर खेळताना आतापर्यंत यश मिळालेले नाही . मागील काही वर्षात ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा इतिहास इंग्लंडच्या खेळपट्टीवर असाच राहिला आहे. ऑस्ट्रलियाचा कर्णधाराचा स्टिव्ह स्मिथचाही रेकॉर्ड एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडमधील खेळपट्टीवर काही वेगळा नाही. म्हणूनच जर या वर्षी ऑस्ट्रलियाला ही ट्रॉफी जिंकायची असेल तर हा इतिहास बदलणे गरजेचे आहे.
महास्पोर्ट्सची भविष्यवाणी – उपांत्य फेरी
ऑस्ट्रलियाचा सध्याचा संघ पहाता वॉर्नर, लिन, आणि स्मिथ हे फलंदाज लयमध्ये आहेत तर हॅझेलवूड इंग्लंडमधील गोलंदाजांनासाठीच्या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी उत्सुक असेल, तर मिचेल स्टार्क दुखापतीनंतर पहिल्यांदाच खेळत आहे. एकंदरीतच ऑस्ट्रलियाचा संघ बघता हा संघ उपांत्य फेरीपर्यंत मजल मारेल असे दिसून येते.
ऑस्ट्रलियाचा संघ :
फलंदाज – स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, एरन फिंच, ट्रेव्हिस हेड, क्रिस लीन
अष्टपैलू – मोझेस हेनरीकेज, ग्लेन मॅक्सवेल, मार्क्स स्टँणीस
यष्टीरक्षक – म्यथिव वेड
फिरकी गोलंदाज – ऍडम झाम्पा
वेगवान गोलंदाज – पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, जॉन हेस्टिंग्ज, जेम्स पट्टीसोन, मिचेल स्टार्क
ऑस्ट्रलियाचे सामने-
जून २ ऑस्ट्रलिया विरुद्ध न्यूझीलँड, बर्मिंघम
जून ५ ऑस्ट्रलिया विरुद्ध बांग्लादेश, द ओव्हल
जून१० ऑस्ट्रलिया विरुद्ध इंग्लंड,एडगबास्टोन