BBL: बिग बॅश लीगचा (BBL) 26 वा सामना मेलबर्न रेनेगेड्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने अष्टपैलू निखिल चौधरी याच्याशी हिंदीत बोलून आपल्याला हिंदी बोलयला येत असल्याचं दाखवलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ब्रेट ली हा बीबीएलमधील कॉमेंट्री पॅनल संघाचा एक भाग आहे आणि त्याने सामन्यात मेलबर्नच्या फलंदाजीच्या नवव्या षटकात निखिल चौधरी याच्याशी बोलत होता. माजी वेगवान गोलंदाजाने भारतीय वंशाच्या खेळाडूशी बोलण्यासाठी हिंदी भाषेचा वापर केला. (bbl 2023 24 brett lee speaks perfect hindi conversation with all rounder nikhil chaudhary)
तो म्हणाला, ‘हा निखिल ब्रेट ली (Brett Lee) बोलत आहे. तू कसा आहेस? तुम्हाला भेटून आनंद झाला.’ याला उत्तर देताना निखिल म्हणाला, ‘तुमची हिंदी खूप चांगली आहे.’
View this post on Instagram
निखिल चौधरी (Nikhil Chaudhary) हा बिग बॅशमधील होबार्ट संघाचा एक भाग आहे, जो मूळचा पंजाबचा आहे. या मेगा लीगचा भाग असणारा 27 वर्षीय खेळाडू हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत आणि 153.19 च्या स्ट्राइक रेटने 72 धावा केल्या आहेत. गोलंदाजीतही त्याच्या नावावर 4 विकेट्स आहेत.
चौधरीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात वेगवान गोलंदाज म्हणून केली आणि ब्रेट लीला तो आपला आदर्श मानतो. काही काळानंतर, त्याने आपल्या फलंदाजी कौशल्यावर काम करण्यास सुरुवात केली आणि सध्या तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत, चौधरीने म्हणाला की, युवराज सिंग (Yuvraj Singh) हा त्याच्यासाठी सर्वात मोठा आदर्श आहे आणि त्याने त्याच्या फलंदाजीत सुधारणा करण्यासाठी त्याने युवराजला श्रेय दिले. तो म्हणाला, “मोठ्या खेळी कशा खेळायच्या आणि मोठ्या लक्ष्याचा सामना करताना मोठा डाव कसा खेळायचा यासारख्या अनेक गोष्टी मी त्याच्याकडून शिकलो. खेळाच्या कोणत्याही टप्प्यावर धावा काढण्याची माझी क्षमता मला माहीत होती. मला खरोखरच आयपीएलखेळून भारतासाठी खेळायचे होते.” (BBL 2023-24 Brett Lee questions player in Hindi during live commentary watch funny video)
हेही वाचा
Ranji Trophy: काय सांगता! बिहारने मुंबई विरुद्धच्या रणजी सामन्यासाठी चक्क दोन संघ केले जाहीर, वाचा नक्की काय आहे प्रकरण
रोहित शर्माने केपटाऊनच्या खेळपट्टीवर उपस्थित केला प्रश्न, विजयानंतर आयसीसीकडे केली मोठी डिमांड