Big Bash League:सध्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगचा चाहत्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. या लीगमध्ये दररोज एकापेक्षा जास्त सामने खेळले जात आहेत. या सामन्यांदरम्यान, या लीगमधून एक वाईट बातमी समोर आली आहे, खरं तर, ग्लेन मॅक्सवेल याच्या टीम मेलबर्न स्टार्सचा यष्टिरक्षक फलंदाज सॅम हार्पर याला सरावादरम्यान डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची दुखापत इतकी गंभीर होती की, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मेलबर्न स्टार्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सॅम हार्पर (Sam Harper) याच्या दुखापतीबाबत अपडेट दिली आहे. संघाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “एमसीजीमध्ये सराव करताना सॅम हार्परच्या डोक्याला चेंडू लागला होता, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे. आम्हाला आणखी काही माहिती मिळाल्यास क्लब तुम्हाला कळवेल.” हार्परच्या दुखापतीची बातमी समोर आल्यानंतर चाहते खूपच नाराज झाले आहेत. यष्टीरक्षक फलंदाज लवकरात लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना चाहते करत आहेत. (bbl 2024 sam harper stable blow head taken hospital)
Club Statement: Sam Harper was struck in the head whilst batting at training this evening at the MCG and subsequently taken to hospital in a stable condition. We ask that you respect his privacy at this time. The club will provide further updates when they come to hand.
— Melbourne Stars (@StarsBBL) January 5, 2024
हार्परच्या दुखापतीनंतर सराव सत्रही तातडीने थांबवण्यात आले. या दुखापतीनंतर हार्पर शनिवारी (6 जानेवारी) सिडनी सिक्सर्सविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. याआधीही हार्परला बिग बॅश लीगमध्ये गंभीर दुखापत झाली होती. 2020 मध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळताना सॅम हार्परला दुखापत झाली होती. त्यादरम्यान त्याची आणि नॅथन एलिस (Nathan Ellis) यांच्यामध्ये जोरदार टक्कर झाली. ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, हार्पर अशा घटनेत जखमी होण्याची ही नववी वेळ आहे.
सॅम हार्परची अनुपस्थिती हा मेलबर्न स्टार्ससाठी मोठा धक्का आहे. या मोसमात तो संघासाठी चांगली कामगिरी करत होता. आता पुढील सामन्यात हार्परची जागा कोण घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (BBL 2023-24 Major incident in Big Bash League, Melbourne Stars wicketkeeper suffers serious head injury)
हेही वाचा
Cricketer of the Year: ICCकडून 2023 ‘क्रिकेटर ऑफ द ईयर’ खेळाडूंची यादी जाहीर, भारताच्या ‘या’ दोन खेळाडूंच्या नावांचा समावेश
INDW vs AUSW । डी वाय पाटीलवर स्मृती-शेफालीचा धमाका, पहिल्या टी-20 ऑस्ट्रेलियालाविरुद्ध तितास साधू ठरली मॅचविनर