ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ आणि माजी उपकर्णधार डेव्हीड वार्नरला बिग बॅश लीग 2018 मध्ये सहभागी होता येणार नसल्याचे बिग बॅश लीगचे प्रमुख किम मॅक्कोनी यांनी स्पष्ट केले आहे.
मार्चमध्ये बॉल टेंम्परींग प्रकरणामुळे वार्नर आणि स्मिथ यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्षाची बंदी घातली होती. तर कॅमरॉन बेनक्रॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी घातली होती.
या तीनही क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्पर्धेत सहभागी होण्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदी घातली होती.
मात्र या तिघांनाही देशाबाहेरील लीग स्पर्धामध्ये सहभागी होण्याची मुभा होती. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया बिग बॅश लीगमध्ये सहभागी होण्याची संधी देईल अशी स्मिथ आणि वार्नरला आशा होती.
या महिन्यात पार पडलेल्या ग्लोबल टी-20 कॅनडा लीगमध्ये स्टीव स्मिथ आणि डेव्हीड वार्नर सहभागी झाले होते.
यामध्ये स्टीव स्मिथने टोरंटो नॅशनल्स संघाकडून सहा सामन्यात 167 धावा केल्या. तर डेव्हीड वार्नरला विनिपेग हॉक्सकडून आठ सामन्यात फक्त 109 धावा करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
-कसोटीसाठी संघ जाहीर झाला नाही तरीही या कारणामुळे रहाणे- विजयचे स्थान पक्के
-फिफा विश्वचषक २०१८: क्रोएशियाच्या लुका मॉड्रीकला गोल्डन बॉल पुरस्कार