गुरुवारी (दि. 2 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग 12 स्पर्धेतील चॅलेंजर सामना खेळला गेला. हा सामना सिडनी सिक्सर्स विरुद्ध ब्रिस्बेन हीट संघात पार पडला. या सामन्यात असे काही घडले, ज्यावर फलंदाजाला आणि गोलंदाजालाही विश्वास बसला नाही. यष्टीरक्षकही हे पाहून दंग झाला. विशेष म्हणजे, ज्यांनी कुणी हे पाहिलं, कदाचित त्यांच्याही भुवया उंचावल्या गेल्या असतील. चला तर नेमकं काय झालं, जाणून घेऊया…
स्टंपवर लागला चेंडू, तरीही फलंदाज नाबाद
सिडनी सिक्सर्स विरुद्ध ब्रिस्बेन हीट (Sydney Sixers vs Brisbane Heat) संघात पार पडलेल्या चॅलेंजर सामन्यात ब्रिस्बेन संघाने 4 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात सिडनी संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली. मात्र, त्यांना यावेळी मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांनी निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 116 धावाच चोपल्या होत्या. यानंतर ब्रिस्बेन संघाचा डाव सुरू झाला. या डावातील सातवे षटक अफगाणिस्तानचा फिरकीपटू इजहारुलहक नवीद (Izharulhaq Naveed) हा टाकत होता. नवीदने षटकाचा पहिला चेंडू फेकताच चेंडूने ऑफ आणि मधल्या रेषेत टप्पा खाल्ला आणि वळण घेत फलंदाजाच्या बॅटला चुकवत पुढे गेला. चेंडू स्टंपवर लागला, परंतु तरीही फलंदाज बाद झाला नाही. खरं तर, चेंडू स्टंपला स्पर्श करून पुढे गेला. त्यामुळे बेल्स पडल्या नाहीत आणि फलंदाज बाद होण्यापासून वाचला.
Another coat of paint and those zing bails probably light up ????@KFCAustralia #BucketMoment #BBL12 #BBLFinals pic.twitter.com/w9qv8Vx85o
— KFC Big Bash League (@BBL) February 2, 2023
रिप्लेमध्ये दाखवण्यात आले की, ज्याप्रकारे चेंडू बॅटची कड घेत पुढे जातो, त्याचप्रकारे स्टंपला स्पर्श करत गेला. त्यामुळे बेल्स खाली पडल्या नाहीत. हे पाहून गोलंदाज, यष्टीरक्षकही हैराण झाले. यावेळी नेथन मॅक्स्वानी फलंदाजी करत होता.
पाचव्या चेंडूवर घेतली विकेट
नवीदला नेथनची विकेट घेण्यासाठी जास्त वाट पाहावी लागली नाही. सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने नेथनला तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी चेंडूने बॅटची कड घेतली आणि यष्टीरक्षक जॉश फिलिपने झेल घेण्यात कोणतीही चूक केली नाही. नवीद आठ चेंडूंचा सामना करत पाच धावांवर तंबूत परतला.
सिडनीचे हे आव्हान ब्रिस्बेन संघाने 18.2 षटकात 6 विकेट्स गमावत पूर्ण केले. तसेच, 4 विकेट्सने सामना नावावर केला. आता स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (दि. 4 फेब्रुवारी) पर्थ येथे पर्थ स्कॉर्चर्स विरुद्ध ब्रिस्बेन हीट संघात खेळला जाईल. (bbl match izharulhaq naveed bowl hit stump still batter was not out brisbane heat vs sydney sixers know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ चार चेंडूंनी बदलले पानटपरीवाल्याच्या मुलाचे नशीब, विश्वचषक तर जिंकून दिलाच; शिवाय अशाप्रकारे केली देशाची सेवा
ब्रेकिंग! रोहित ज्याच्या कॅप्टन्सीखाली खेळला, त्याची 71 लाखांची फसवणूक; कुटुंबासह जीवे मारण्याचीही धमकी






