Glenn Maxwell Six Video: बिग बॅश लीग 2023-24 स्पर्धेतील 17वा सामना होबार्ट हरिकेन्स विरुद्ध मेलबर्न स्टार्स संघात पार पडला. हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार, मेलबर्न स्टार्सने 7 विकेट्सने आपल्या नावावर केला. या सामन्याचा शिल्पकार कर्णधार ग्लेन मॅक्सवेल ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने यादरम्यान नाबाद 35 धावांची खेळी करत आव्हान सहजतेने पार केले. मॅक्सवेलला त्याच्या खेळीत षटकारांची आतिषबाजी करताना पाहून बीबीएलच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून लक्षवेधी पोस्ट शेअर करण्यात आली, जी सर्वांचे लक्ष वेधत आहे.
मेलबर्न स्टार्सचा 7 विकेट्सने विजय
या सामन्यात मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी होबार्ट हरिकेन्स (Hobart Hurricanes) संघाने 19.4 षटकात सर्व विकेट्स गमावत 155 धावा केल्या होत्या. मात्र, पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार, स्टार्सला विजयासाठी 7 षटकात 67 धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना मेलबर्न स्टार्सने 6.3 षटकातच 3 विकेट्स गमावत 67 धावा केल्या आणि सामना 7 विकेट्सने खिशात घातला.
मॅक्सवेलचा धमाका
यावेळी मेलबर्नकडून सलामीला फलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने 18 चेंडूंचा सामना करताना 194.44च्या स्ट्राईक रेटने नाबाद 35 धावांची विस्फोटक खेळी केली. त्याच्या या खेळीत 4 षटकारांचा समावेश होता. मॅक्सवेलने ख्रिस जॉर्डन टाकत असलेल्या डावातील चौथ्या षटकात दोन षटकारांचा पाऊस पाडला. अखेरच्या चेंडूवर मॅक्सवेलने सहजरीत्या चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या वरून षटकारासाठी पाठवला. मॅक्सवेलचा हा धमाका पाहून बीबीएलच्या (BBL) एक्स हँडलवरून ट्वीट करण्यात आले.
बीबीएल एक्स हँडलवर मॅक्सवेलच्या षटकारांचा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन देण्यात आले की, “बास कर, मॅक्सी. हे खूपच चांगले आहे.” आता ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे.
Stop it, Maxi.
That's too good. #BBL13 pic.twitter.com/XmoUvglMLO
— KFC Big Bash League (@BBL) December 28, 2023
होबार्टच्या मेहनतीवर पाणी
मॅक्सवेलव्यतिरिक्त मेलबर्नकडून थॉमस रॉजर्स यानेही नाबाद 21 धावांची खेळी केली. यावेळी होबार्टकडून गोलंदाजी करताना रिले मेरेडिथ याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच, कर्णधार नेथन एलिस याला 1 विकेट घेण्यात यश आले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना होबार्ट हरिकेन्सकडून कॅलेब ज्वेल याने सर्वाधिक 45 धावांचे योगदान दिले होते. त्याच्याव्यतिरिक्त मॅकेलिस्टर राईटने 33 आणि निखिल चौधरीने 32 धावा केल्या होत्या. इतर एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. यावेळी होबार्ट संघ 155 धावांपर्यंत मजल मारू शकला, पण पावसाने त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले. त्यामुळे स्टार्सला 7 षटकात 67 धावांचे आव्हान मिळाले आणि ते त्यांनी सहजरीत्या पार करत स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला. (BBL posted stop it maxi after glenn maxwell hit fabulous six see post here)
हेही वाचा-
द्विशतक हुकले पण एल्गरने महान फलंदाजांच्या पंक्तीत मिळवले स्थान, वाचा 185 धावांची खेळी का ठरली खास
IND vs AUS ODI: जेमिमा अन् पूजाच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाचे कांगारूंना 283 धावांचे आव्हान