काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून श्रेयस अय्यर आणि ईशान किशन या दोन खेळाडूंना वगळण्यात आलं होतं. रणजी ट्रॉफी आणि इतर देशांतर्गत सामने न खेळल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. अलीकडेच बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की, या दोन क्रिकेटपटूंना वगळण्याचा निर्णय त्यांचा नसून मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचा आहे. आता अशी बातमी आली आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं अय्यर आणि किशनसह 30 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे, ज्यांच्यावर निवड समिती लक्ष ठेवणार आहे.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये एक सराव शिबिर सुरू होईल, जे सुमारे महिनाभर चालेल. या शिबिरात श्रेयस अय्यर, ईशान किशन, मयंक यादव, मुशीर खान, साई किशोर, पृथ्वी शॉ यांच्यासह 30 खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवलं जाणार आहे. या 30 खेळाडूंपैकी बहुतांश खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या मुशीर खाननं मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. रणजी ट्रॉफी 2023-2024 च्या 3 नॉकआउट सामन्यांमध्ये त्यानं 433 धावा केल्या होत्या. व्हीव्हीएस लक्ष्मण हे या प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख असतील.
बीसीसीआयच्या एका सूत्रानं सांगितलं की, “बीसीसीआय किंवा निवड समितीचं श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांच्याशी कोणतंही वैर नाही. जर त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि आपापल्या मुंबई व झारखंड संघांसाठी खेळले तर ते त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. त्याची कामगिरी चांगली राहिल्यास त्यांचं टीम इंडियात पुनरागमनही शक्य आहे. निवड समिती अय्यर आणि किशनवर लक्ष ठेवून आहे.”
या 30 खेळाडूंवर असेल लक्ष – श्रेयस अय्यर, ईशान किशन, मुशीर खान, साई किशोर, पृथ्वी शॉ, मयंक यादव, उमरान मलिक, आवेश खान, कुलदीप सेन, हर्षित राणा, खलील अहमद, तुषार देशपांडे, रियान पराग, आशुतोष शर्मा, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, शम्स मुलानी आणि तनुष कोटियन
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरल्यानंतर विजय माल्ल्यांची प्रतिक्रिया व्हायरल, खास ट्विट करून म्हणाले…