भारत विरुद्ध श्रीलंका संघात (India vs Sri Lanka) नुकतीच टी२० मालिका खेळवण्यात आली होती. आता या मालिकेनंतर ४ मार्चपासून या दोन संघात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी खास असणार आहे. कारण विराटसाठी हा कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना (100th Test) आहे. त्याच्या या सामन्यासाठी बीसीसीआय एक चांगली बातमी दिली आहे.
मोहालीतील या सामन्यासाठी बीसीसीआयने आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देणार असल्याचे सांगितले आहे (allow 50 percent crowd). बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयाने चाहत्यांना आनंद झाला आहे. आता या सामन्यासाठी तिकीटे कधी उपलब्ध होणार हे पाहावे लागणार आहे.
खरंतर बीसीसीआयने यापूर्वी या सामन्यासाठी प्रेक्षकांना कोविड-१९ मुळे स्टेडियममध्ये परवानगी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे पंजाब क्रिकेट असोसिएशनने विराटचा १०० वा कसोटी सामना साजरा करण्यासाठी पूर्ण स्टेडियममध्ये होर्डिंग लावले होते.
पण आता पंजाब क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आरपी सिंगला यांनी पीटीआयला सांगितले की, ‘बीसीसीआयने आम्हाला आगामी कसोटी सामन्यासाठी स्टेडियममधील आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवानगी दिली आहे.’ तसेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले की, ‘भारत आणि श्रीलंका यांच्यातील मोहालीला होणारा पहिला कसोटी सामना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळला जाणार नाही.’
यापूर्वी जेव्हा या सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती, तेव्हा दिग्गज फलंदाज सुनील गावसकरांनी नाराजी व्यक्त केली होती.
विराट १०० वा कसोटी सामना करू शकतो खास
विराट कोहलीला आपल्या १०० व्या कसोटीत एक खास कारनामा करण्याची संधी असणार आहेत. विराटने जर या सामन्यात शतकी खेळी केली, तर तो १०० व्या कसोटीत शतक करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरेल. तसेच जगातील १० वा फलंदाज ठरेल. यापूर्वी असा कारनामा ग्रॅमी स्मिथ, हाशिम आमला, कॉलिन कॉवड्रे, ऍलेक स्टिवर्ट, जो रूट, गोर्डन ग्रिनिज, रिकी पाँटिंग, जावेद मियाँदाद आणि इंजमाम उल हक या क्रिकेटपटूंनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: पोलार्ड झाला फिरकीपटू! त्रिनिदाद टी१० स्पर्धेत यष्टीरक्षक फलंजादाला अडकवले फिरकीच्या जाळ्यात
विराटने १०० व्या कसोटीत केवळ ९ खेळाडूंना जमलेली ‘ती’ कामगिरी करावी, सुनील गावसकरांची इच्छा
दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत राखून भारताचा करून दिला फायदा, पाहा कसं?