भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील पहिल्या कसोटीत दिमाखदार विजय मिळवल्यानंतर बीसीसीआयने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. याआधी बीसीसीआयने केवळ पहिल्या चेन्नईच्या सामन्यासाठी संघाची घोषणा केली होती. दरम्यान आता दुसऱ्या सामन्यासाठी खेळाडूंची निवड यादी समोर आली आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 अंतर्गत खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांग्लादेशचा दारुण पराभव केला. सामन्यात भारताने बांग्लादेशचा 280 धावांनी एकतर्फी पराभव केला. धावांच्या बाबतीत भारताचा बांग्लादेशविरुद्धचा हा सर्वात मोठा कसोटी विजय होता. दरम्यान आता बीसीसीआयने दुसऱ्या सामन्यासाठी संघाची घोषणा केली. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी बीसीसीआयने तोच (पहिल्या कसोटीसाठी) संघ कायम ठेवला आहे. आगोदरच्या संघात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.
🚨 NEWS 🚨
India retain same squad for 2nd Test against Bangladesh.
More Details 🔽 #TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBankhttps://t.co/2bLf4v0DRu
— BCCI (@BCCI) September 22, 2024
बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव , मोहं. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल
पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण तो त्यांच्यावरच उलटला. पहिल्या डावात फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली असली तरी खालच्या फळीतील फलंदाज अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी संघाला सावरले. टीम इंडियाला मजबूत धावसंख्येपर्यंत पोहचवले. पहिल्या डावात टीम इंडियाने 376-10 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या बांग्लादेश संघाची सुरुवात फारच निराशाजनक झाली. पहिल्या 10 षटकातच संघाच्या 3 विकेट्स पडल्याने संघ बॅकफूटवर पडला त्यामुळे संघाला पुन्हा कमबॅक करता आले नाही. भारतीय गोलंदाजी युनीटने 149 धावांवर संघाला गुंडाळले.
227 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावात फलंदाजी करताना टीम इंडियाकडून रिषभ पंत आणि शुबमन गिल यांनी शतकी खेळी खेळली. त्यांच्या जोरावर संघाने 287-4 धावा केल्या. आशाप्रकारे बांग्लादेश समोर भारताने 515 धावांचे तगडे लक्ष्य दिले. इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बांग्लादेश संघाने ठोस सुरुवात केली. सलामी जोडीदारांनी आक्रमक फलंदाजी करत टीम इंडियाला एकेकाळी टेंन्शनमध्ये आणले होते. पण 62 धावांवर संघाचा पहिला विकेट पडला त्यानंतर संघ गडगडला. शानदार सुरुवातीनंतरही संघ केवळ 234 धावा करु शकला. दरम्यान टीम इंडियाकडून गोलंदाजी करताना अश्विनने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा-
‘हिटमॅन’नं सचिनला मागे टाकलं! जागतिक क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
चेन्नई कसोटीच्या दिमाखदार विजयानंतर दुसऱ्या सामन्यासाठी संघाची घोषणा: पाहा बदल
WTC: गुणतालिकेत टीम इंडियाला बंपर फायदा, बांग्लादेशला 440 व्होल्टचा धक्का!