मागीलवर्षी आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांचा प्रदर्शनिय सामना खेळवण्यात आला होता. या सामन्याचे यश पाहुन यावर्षीही आयपीएलमध्ये महिलांच्या 4 टी20 सामन्यांची प्रदर्शनीय मालिका खेळवली जाणार आहे.
या महिला ट्वेंटी20 चॅलेंज मालिकेत यावर्षी तीन संघ सहभागी होणार आहेत. तसेच ही स्पर्धा आयपीएलच्या प्लेऑफ दरम्यान 6 मे ते 11 मे रोजी खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेत मागीलवर्षी हरमनप्रीत कौर कर्णधार असलेल्या सुपरनोवा आणि स्मृती मानधना कर्णधार असलेल्या ट्रेलब्लेझर्स संघात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एकमेव सामना झाला होता.
पण यावर्षी सुपरनोवा आणि ट्रेलब्लेझर्ससह वेलोसिटी हा नवीन संघ या महिला आयपीएल स्पर्धेत दाखल होत आहे. हे तीन संघ 6,8 आणि 9 मे रोजी राउंड रॉबीन पद्धतीने एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहेत.
6 मेला पहिला सामना ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवा संघात होणार असून 8 मेला ट्रेलब्लेझर्स विरुद्ध वेलोसिटी संघात सामना होईल. तर 9 मेला सुपरनोवा विरुद्ध वेलोसिटी असा सामना होईल. त्यानंतर अव्वल दोन संघ 11 मे ला अंतिम सामना खेळतील. हे चारही सामने जयपूरमध्ये होणार आहेत.
याबद्दल बीसीसआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘या तीन संघात भारतीय संघातील सध्याचे आणि भविष्यातील स्टार खेळाडू जगातील निवडक सर्वोत्तम खेळाडूंबरोबर खेळतील.’
पण अजून तीनही संघातील खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आलेली नसून काही रिपोर्टप्रमाणे या तीन संघांचे नेतृत्व मिताली राज, स्म्रीती मानधना, हरमनप्रीत कौर करतील.
महत्त्वाच्या बातम्या –
–आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये महाराष्ट्राच्या राहुल आवारेला कांस्यपदक
–Video: निवृत्तीआधी सीएसकेच्या यशाचे गुपित सांगण्यास एमएस धोनीचा नकार, हे आहे कारण
–मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हा वेगवान गोलंदाज होणार सामील