---Advertisement---

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कर्णधारपदी रोहित नव्हे ‘हा’ खेळाडू

On: बुधवार, जुलै 6, 2022 3:48 PM
Team India
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाला जुलै-ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात उभय संघांना ३ सामन्यांची वनडे आणि ५ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. २२ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी बुधवारी (०६ जुलै) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

या मालिकेसाठी (IND vs WI) संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.  भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासहित विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे शिखर धवन (Shikhar Dhawan) याचे संघात पुनरागमन झाले असून त्याच्यावर नेतृत्त्वपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे. तर अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकांसाठी निवडल्या गेलेल्या अधिकतर खेळाडूंना या संघात कायम ठेवण्यात आले आहे. यात दीपक हुड्डा, संजू सॅमसन ते अर्शदीप सिंग यांना निवडले गेले आहे. तर अनुभवी दिनेश कार्तिकला संघात जागा दिली गेलेली नाही. तसेच युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांच्यावरही वनडे स्वरूपासाठी संघ व्यवस्थापनाने विश्वास दाखवलेला नाही.

दरम्यान भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ जुलै रोजी त्रिनिदाद येथे होईल. त्यानंतर २४ जून रोजी आणि २७ जून रोजी भारतीय संघ त्रिनिदाद येथे दुसरा व तिसरा वनडे सामना खेळेल.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

पाचवी कसोटी गाजवणाऱ्या रिषभ पंतची मोठी झेप, पहिल्यांदाच कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी विराजमान

ब्रेकिंग! वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कर्णधारपदी रोहित नव्हे ‘हा’ खेळाडू

विम्बल्डन २०२२। दोन सेट मागे असताना जोकोविचचे दमदार पुनरागमन, उलगडले सेमीफायनलमध्ये पोहोचण्यामागचे रहस्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---