गेल्या काही दिवसात भारतीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात बरेचसे आश्चर्यकारक निर्णयही घेण्यात आले. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. दरम्यान निवड समितीमध्ये देखील मोठा बदल करण्यात आला आहे.
विराट कोहलीने हा मोठा निर्णय घेतल्याच्या एक दिवसानंतर बीसीसीआयने नवीन निवड समितीची घोषणा केली आहे. परंतु ही नवीन निवड समिती कनिष्ठ पातळीवर काम करणार आहे. बीसीसीआयने शुक्रवारी (१७ सप्टेंबर) या समितीची घोषणा करत, तामिळनाडूचे माजी रणजीपटू शरत श्रीधरन यांना समितीचे अध्यक्षपद बनवले आहे.
बीसीसीआयने नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर करत, नवीन ज्युनियर निवड समितीची घोषणा केली आहे. या प्रसिद्धीपत्रकात बोर्डाने पाचही विभागामधून निवडण्यात आलेल्या सदस्यांची नावे जाहीर केली आहे. दक्षिण विभागामधून शरत श्रीधरन, पश्चिम विभागामधून पथिक पटेल, सेंट्रल विभागामधून हरविंदर सिंग सोढी तर पूर्व विभागामधून बंगालचे माजी वेगवान गोलंदाज रणदेब बोस यांची निवड करण्यात आली आहे.
NEWS 🚨- BCCI announces appointment of Junior Selection Committee members.
Former Tamil Nadu captain Mr Sharath Sridharan will head the committee.
More details here – https://t.co/apdUWRJoV8 pic.twitter.com/2sIZBx30aT
— BCCI (@BCCI) September 17, 2021
ही असेल मोठी जबाबदारी
नवीन निवड समिती समोर १९ वर्षांखालील संघ निवडण्याची जबाबदारी असणार आहे. पुढच्या वर्षी वेस्ट इंडिजमध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या संघाची निवड करण्याची जबाबदारी नवीन निवड समितीवर असणार आहे. भारतीय १९ वर्षांखालील संघाने शेवटचा विश्वचषक २०१८ मध्ये जिंकला होता. त्यावेळी पृथ्वी शॉ संघाचा कर्णधार होता. तर शुबमन गिल देखील त्या संघात होता. त्यानंतर २०२० मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम सामन्यात बांगलादेश संघाने पराभूत केले होते.
श्रीधरन यांची कारकीर्द
नवीन निवड समितीची धुरा सांभाळणारे श्रीधरन यांनी तामिळनाडू रणजी संघाचे नेतृत्व केले आहे. १५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी १३९ सामने प्रथम श्रेणी खेळले आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीत ५१ च्या सरासरीने ८७०० धावा केल्या आहेत. ज्यामध्ये २७ शतक आणि ४२ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अगग! पाकिस्तानचे इंग्रजीचे वांदे, ‘आम्ही न्यूझीलंडसाठी Fool प्रुफ नियोजन केले’ म्हणत झाले ट्रोल