भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) शुक्रवारी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची निवड केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 8 नोव्हेंबरपासून टी20 मालिका खेळवली जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत कर्णधार सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन यांच्याशिवाय युवा खेळाडू तिलक वर्मा, रिंकू सिंग, कर्नाटकचा वेगवान गोलंदाज विजयकुमार विशाख आणि पंजाबचा फलंदाज रमणदीप सिंग यांचे निवड करण्यात आले. वेगवान गोलंदाज मयंक यादवला दुखापत झाली असून तो पुनर्वसनासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील 18 सदस्यीय भारतीय कसोटी संघात दिल्लीचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि आंध्रचा अष्टपैलू नितीश रेड्डी यांचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रमणदीप सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई , अर्शदीप सिंग, विजयकुमार विशाख, आवेश खान, यश दयाल
हेही वाचा-
BGT 2024-25; बाॅर्डर गावसकर ट्राॅफीसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ युवा खेळाडूला संधी
सेहवागने राजकारण करुन मला फसवलं! पंजाब किंग्जच्या माजी कर्णधाराचे गंभीर आरोप
चेंडू लागला, रक्तस्त्राव होऊ लागला; तरीही पाकिस्तानच्या खेळाडूने सोडलं नाही मैदान