भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआयनं दुलीप ट्रॉफी 2024 च्या पहिल्या फेरीच्या सामन्यांसाठी संघांची घोषणा केली आहे. या स्पर्धेत शुबमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर नेतृत्व करताना दिसणार आहेत. गिल टीम ए चा कर्णधार असेल, ईश्वरन टीम बी चा कर्णधार असेल, टीम सी चा कर्णधार ऋतुराज आणि अय्यर टीम डी चा कर्णधार असेल.
यावेळी डझनभर आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत, कारण भारताला आगामी काळात 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. ही स्पर्धा 5 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. हे सामने आंध्र प्रदेशातील अनंतपूर आणि बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळले जातील. या स्पर्धेच्या सुरुवातीला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली जाईल, संघात जे खेळाडू निवडले जातील त्यांना दुलीप ट्रॉफीच्या बाहेर ठेवण्यात येईल आणि काही युवा खेळाडूंना संधी दिली जाईल.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी चार संघ पुढीलप्रमाणे
टीम अ : शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुश कोटियान, कुलदीप यादव, आकाश दीप , प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विदवथ कवरप्पा, कुमार कुशाग्र आणि शास्वत रावत
टीम ब : अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, रिषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी (फिटनेसवर अवलंबून), वॉशिंगटन सुंदर, रविंद्र जड़ेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चाहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी आणि एन जगदीशन (विकेटकीपर)
टीम क : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, रितिक शौकीन, मानव सुथार, उमरान मलिक, विशाक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशु चौहान, मयंक मारकंडे, आर्यन जुयाल (विकेटकीपर) आणि संदीप वॉरियर
टीम ड : श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, ईशान किशन (विकेटकीपर), रिकी भुई, सारांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत (विकेटकीपर) आणि सौरभ कुमार
हेही वाचा –
ब्रेकिंग बातमी: मोर्ने मॉर्केलची टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती
(15 ऑगस्ट) धोनीच्या स्टाईलमध्ये क्रिकेटला अलविदा करणार भारताचे हे 3 धुरंधर?
मुंबई इंडियन्सला रोहितच्या अटी मान्य, कर्णधार बदलणार?