---Advertisement---

बीसीसीआयची दरियादिली! पिच क्यूरेटर आणि ग्राउंड्समनलाही केले मालामाल, दिले चक्क कोटीत पैसे

On: सोमवार, मे 30, 2022 8:27 PM
ganguly shah
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हे क्रिकेटविश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जाते. तर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) जगतील सर्वात मोठी लीग म्हणून ओळखली जाते. क्रिकेटजगातील जवळपास प्रत्येक खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उस्तुक असतो. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे, येथून मिळणारी प्रसिद्धी आणि पैसा.

नुकताच आयपीएल २०२२चा हंगाम संपला. या हंगामात विजेत्या गुजरात टायटन्सपासून ते वेगवेगळ्या खेळाडूंपर्यंत अनेकांनी वेगवेगळे पुरस्कार जिंकत अधिकची कमाई केली. दरम्यान आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या पिच क्यूरेटर आणि ग्राउंड्समन यांनाही बीसीसीआयने पुरस्कार जाहीर केले आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याबद्दल ट्वीट करत माहिती दिली आहे.

IPLमध्ये करोडोंची बोली लागल्यानंतर खरंच तेवढे पैसे Cricketersच्या खात्यात जमा होतात का?

जय शहांनी ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, साखळी फेरीतील सामन्यांचे आयोजन करणाऱ्या ४ स्टेडियमला प्रत्येकी २५ लाख रुपये दिले जाणार आहेत. पुण्याचे गहुंजे स्टेडियम, मुंबईचे वानखेडे स्टेडियम, डी वाय पाटील स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियम यांचा यात समावेश आहे. तर प्लेऑफ सामन्यांचे आयोजन करणाऱ्या कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियम आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या पिच क्यूरेटर आणि ग्राउंड्समनला प्रत्येकी १२.५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. 

जय शहांनी ट्वीट करत लिहिले आहे की, “मला त्या लोकांसाठी १.२५ कोटींची पुरस्कार राशी घोषित करायला आनंद होत आहे, ज्यांनी टाटा आयपीएल २०२२ साठी पडद्यामागील नायकांची भूमिका बजावली आहे. आपल्या पिच क्यूरेटर आणि ग्राउंड्समननी आयपीएलच्या वेगवेगळ्या ६ स्थानांवरील यशस्वी आयोजनात मोठी भूमिका बजावली आहे.”

पुढे दुसरे ट्वीट करत शहांनी लिहिले आहे की, “तसेच आपल्याला काही रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. त्यासाठीच्या मेहनतीसाठी प्रत्येकाचे आभार. वानखेडे स्टेडियम, गहुंजे स्टेडियम, डी वाय पाटील स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियमच्या पीच क्यूरेटर्स आणि ग्राउंड्समनला प्रत्येकी २५ लाख रुपये देण्यात येतील. तर ईडन गार्डन आणि नरेंद्र मोदी स्टेडियमच्या पिच क्यूरेटर्स आणि ग्राउंड्समनला १२.५ लाख मिळतील.”

महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---