गुरुवारी(7 मार्च) बीसीसीआयसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेल्या समितीने भारतीय क्रिकेटपटूंच्या 2018-19 या मोसमातील वार्षिक मानधन कराराची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार मागील वर्षीप्रमाणेच या वर्षीही मानधनाच्या 4 श्रेणी करण्यात आल्या आहेत. यात अ+, अ, ब, आणि क अशा श्रेणी असतील.
या करारानुसार अ+ श्रेणीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 या कालावधीसाठी 7 कोटी रुपयांचे मानधन मिळेल.
त्याचबरोबर शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमारला मात्र अ+ श्रेणीतून वगळण्यात आले असून त्यांचा अ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. शिखर सप्टेंबर 2018पासून कसोटी क्रिकेटपासून दूर आहे. त्याला मागील वर्षी इंग्लंड दौऱ्यात चार कसोटी सामन्यात 20.25 च्या सरासरीने फक्त 162 धावा करता आल्या होत्या.
त्यांच्यासह अ श्रेणीमध्ये मोहम्मद शमी, रिषभ पंत यांंचाही समावेश आहे. शमी आणि पंतची मागील वर्षभरात चांगली कामगिरी झाली आहे. त्यामुळे त्यांना अ श्रेणीत बढती मिळाली आहे. मात्र चेतेश्वर पुजाराला सर्वांना अपेक्षित असणारी बढती मिळालेली नाही. त्यामुळे त्याला अ श्रेणीमध्येच कायम ठेवण्यात आले आहे.
या अ श्रेणीमध्ये 11 खेळाडूंचा सहभाग आहे. या श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी एवढे वार्षिक मानधन मिळणार आहे.
तसेच ब श्रेणीमध्ये हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांना कायम करण्यात आसे आहे. या श्रेणीत त्यांच्यासह युजवेंद्र चहल आणि उमेश यादव यांचाही समावेश आहे. या श्रेणीतील खेळाडूंना 3 कोटी असे वार्षिक मानधन दिले जाणार आहे.
त्याचबरोबर क श्रेणीमध्ये एकूण 7 क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. या श्रेणीतील खेळाडूंना 1 कोटी एवढे वार्षिक मानधन मिळणार आहे.
मात्र भारतीय संघाकडून वनडे आणि टी20 सामने खेळणाऱ्या विजय शंकरला मात्र यातील कोणत्याही श्रेणीत स्थान देण्यात आलेले नाही.
या वार्षिक मानधन करारात एकूण 25 पुरुष क्रिकेटपटूंचा आणि 20 महिला क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे.
महिलांच्या करारामशध्ये 3 श्रेणींचाच समावेश आहे. यामध्ये अ श्रेणीसाठी 50 लाख, ब श्रेणीसाठी 30 लाख आणि क श्रेणीसाठी 10 लाख एवढे मानधन दिले जाणार आहे.
या पुरुष क्रिकेटपटूंचा झाला वार्षिक मानधन करारात समावेश-
अ+ श्रेणी – विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा
अ श्रेणी – आर अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, शिखर धवन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, कुलदीप यादव, रिषभ पंत.
ब श्रेणी – केएल राहुल, उमेश यादव, युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या.
क श्रेणी – केदार जाधव, दिनेश कार्तिक, अंबाती रायडू, मनीष पांडे, हनुमा विहारी, खलील अहमद, वृद्धिमान साहा
या महिला क्रिकेटपटूंचा झाला वार्षिक मानधन करारात समावेश-
अ श्रेणी – मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्म्रीती मंधाना आणि पूनम यादव
ब श्रेणी – एकता बिष्त, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, दिप्ती शर्मा आणि जेमिमा रोड्रिगेज
क श्रेणी – राधा यादव, डी हेमलता, अनुजा पाटिल, वेदा कृष्णमूर्ती, मानसी जोशी, पूनम राउत, मोना मेश्राम, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर आणि तानिया भाटिया.
महत्त्वाच्या बातम्या –
–माझं एवढ नशिबच नव्हतं, नाहीतर धोनी भाईबरोबर ड्रेसिंग रुम नक्की शेअर केली असती
–५ चेंडूत २ धावा हव्या असताना आणि ४ विकेट्स बाकी असतानाही संघ हरला, जाणून घ्या कसा
–दुसऱ्या वनडेत ग्लेन मॅक्सवेलने केली फेक फिल्डिंग, पंचांनी केली नाही कोणतीही शिक्षा






