---Advertisement---

१५ वर्षीय शेफाली वर्माचा बीसीसीआयच्या वार्षिक मानधन करारात समावेश, पहा संपूर्ण यादी

On: शुक्रवार, जानेवारी 17, 2020 12:12 PM
---Advertisement---

गुरुवारी (16 जानेवारी) बीसीसीआयने ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी वरिष्ठ भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या वार्षिक मानधन कराराची यादी जाहीर केली आहे.  या यादीनुसार महिला खेळाडूंची 3 श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे. यात अ, ब, आणि क अशा श्रेणी असतील.

यामध्ये अ श्रेणीसाठी 50 लाख, ब श्रेणीसाठी 30 लाख आणि क श्रेणीसाठी 10 लाख एवढे मानधन दिले जाणार आहे.

यावर्षीच्या बीसीसीआयच्या महिला क्रिकेटपटूंच्या वार्षिक मानधन करारात 15 वर्षीय शेफाली वर्माचाही समावेश करण्यात आला आहे. तिचा क श्रेणीत समावेश आहे.

https://twitter.com/ICC/status/1217810790746664960

या यादीनुसार अ श्रेणीत हरमनप्रीत कौर, स्म्रीती मंधाना आणि पूनम यादव या तीन खेळाडूंचा समावेश आहे. मात्र या श्रेणीतून भारताची दिग्गज क्रिकेटपटू मिताली राजला वगळण्यात आले आहे. आता तिचा ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी घोषित करण्यात आलेल्या वार्षिक मानधन करारात ब श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.

मितालीसह ब श्रेणीत झुलन गोस्वामी, एकता बिष्ट, राधा यादव, शिखा पांडे, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिगेज आणि तानिया भाटिया यांचा समावेश आहे.

यांच्यातील तानिया भाटिया आणि राधा यादव यांना यावर्षी ब श्रेणीत बढती मिळाली आहे. त्यांचा मागीलवर्षी क श्रेणीत समावेश होता. तानिया, राधा आणि मिताली व्यतिरिक्त अन्य खेळाडूंना ब श्रेणीत स्थान कायम राखण्यात यश आले आहे.

त्याचबरोबर क श्रेणीत एकूण 11 महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. या श्रेणीत शेफाली वर्मासह हर्लिन देओल आणि प्रिया पुनियाचा पहिल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

यांच्याव्यतिरिक्त वेदा कृष्णमूर्ती, पुनम राऊत, अनुजा पाटील, मानसी जोशी, डी. हेमलता, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड आणि पूजा वस्त्राकर यांना क श्रेणीत त्यांचे स्थान कायम राखण्यात यश मिळाले आहे.

तसेच मोना मेश्रामला या करारातून वगळण्यात आले आहे.

ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी असणाऱ्या वार्षिक मानधन करारात एकूण 22 महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

या महिला क्रिकेटपटूंचा झाला वार्षिक मानधन करारात समावेश-

अ श्रेणी – हरमनप्रीत कौर, स्म्रीती मंधाना आणि पूनम यादव

ब श्रेणी – मिताली राज, झुलन गोस्वामी, एकता बिष्ट, राधा यादव, शिखा पांडे, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिगेज आणि तानिया भाटिया

क श्रेणी – वेदा कृष्णमूर्ती, पुनम राऊत, अनुजा पाटील, मानसी जोशी, डी. हेमलता, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, शेफाली वर्मा, हर्लिन देओल आणि प्रिया पुनिया.

https://twitter.com/Maha_Sports/status/1218049125561749505

https://twitter.com/Maha_Sports/status/1217815391684050944

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---