टीम इंडियाने 2025 च्या अंडर-19 महिला टी20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. 19 वर्षांखालील महिला संघाचे हे सलग दुसरे विजेतेपद होते. या जेतेपदानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाचे अभिनंदन करत 5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
बीसीसीआयने सोशल मीडियाद्वारे अंडर-19 महिला संघासाठी बक्षीस जाहीर केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हटले आहे की हे बक्षीस संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आहे.
सोशल मीडिया ‘एक्स’वरील पोस्टमध्ये बीसीसीआयने लिहिले की, “टी20 विश्वचषकातील सलग विजयासाठी बीसीसीआयने भारतीय महिला अंडर19 संघाचे अभिनंदन केले आहे. विजेत्या संघाला 5 कोटी रुपये आणि मुख्य प्रशिक्षक नुशीन अल खादीर यांच्या नेतृत्वाखालील सपोर्ट स्टाफला 5 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.”
BCCI Congratulates #TeamIndia Women’s U19 Team for Back-to-Back T20 World Cup Triumphs, announces a cash reward of INR 5 Crore for the victorious squad and support staff, led by Head Coach Nooshin Al Khadeer.#U19WorldCup
Details 🔽
— BCCI (@BCCI) February 2, 2025
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. 20 षटकांत 10 बाद 82 धावा केल्या. यादरम्यान, मिके व्हॅन वुर्स्टने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. तिने 18 चेंडूत 3 चौकारांसह 23 धावा केल्या. संघाचे एकूण चार फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाहीत. भारताकडून गोंगाडी त्रिशाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 11.2 षटकांत 84/1 धावा केल्या आणि 9 विकेट्सने विजय मिळवला. यादरम्यान गोंगाडी त्रिशाने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. तिने 33 चेंडूत 8 चौकारांसह 44* धावा केल्या. त्रिशाला गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘प्लेअर ऑफ द मॅच’ किताब देण्यात आला.
हेही वाचा-
भारताने 247 धावा करत इतिहास रचला, इंग्लंडसोबत टी20 मध्ये असं पहिल्यांदाच घडलं
गोंगाडी त्रिशाने घडवला इतिहास; रचला ‘हा’ नवा विक्रम
IND vs ENG; अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! झळकावले तुफानी शतक