यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात 2 टी20 आणि 5 वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिका 24 फेब्रुवारी ते 13 मार्च दरम्यान होणार आहे.
या मर्यादीत षटकांच्या मालिकेचे वेळापत्रक बीसीसीआयने आज जाहिर केले आहे. यामध्ये 24 आणि 27 फेब्रुवारीला अनुक्रमे पहिला आणि दुसरा टी20 सामना पार पडेल. हे टी20 सामने बंगळूरु आणि विशाखापट्टणम येथे होणार आहेत.
त्यानंतर 2 मार्चपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. या वनडे मालिकेतील पहिला सामना हैद्राबादला होणार आहे. त्यानंतर नागपूर, रांची, मोहाली आणि दिल्ली येथे वनडे सामने होतील.
टी20 सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होतील. तर वनडे सामने दुपारी 1.30 वाजता सुरु होतील.
ही मालिका दोन्ही संघासाठी मेमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून 12 जानेवारीपासून या दोन संघात 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात 3 टी20 आणि 5 वनडे मालिका होणार आहेत.
असा असेल ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा –
टी20 मालिका –
पहिला टी20 सामना – 24 फेब्रुवारी – बंगळूरु – वेळ: संध्या. 7.00 वाजता
दुसरा टी20 सामना – 27 फेब्रुवारी – विशाखापट्टणम – वेळ: संध्या. 7.00 वाजता
वनडे मालिका –
पहिला वनडे सामना – 2 मार्च – हैद्राबाद – वेळ: दुपारी 1.30 वाजता
दुसरा वनडे सामना – 5 मार्च – नागपूर – वेळ: दुपारी 1.30 वाजता
तिसरा वनडे सामना – 8 मार्च – रांची – वेळ: दुपारी 1.30 वाजता
चौथा वनडे सामना – 10 मार्च – मोहाली – वेळ: दुपारी 1.30 वाजता
पाचवा वनडे सामना – 13 मार्च – दिल्ली – वेळ: दुपारी 1.30 वाजता
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएल गाजवलेल्या दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटूचा सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा…
–जेव्हा ३४३ धावांचे लक्ष दिलेला संघ होतो ३५ धावांवर सर्वबाद
–हरेंद्र सिंग यांची पुरूष हॉकी संघाच्या पदावरून गच्छंती