---Advertisement---

दोन नव्या आयपीएल संघांसाठी बीसीसीआयने जाहीर केले टेंडर, ‘असे’ आहेत नियम आणि अटी

On: मंगळवार, ऑगस्ट 31, 2021 3:57 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील उर्वरित सामन्यांना येत्या १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यातच काही महिन्यांपूर्वी अशी चर्चा होती की इंडियन प्रीमीयर लीगच्या १५ व्या हंगामात म्हणजेच २०२२ हंगामात ८ ऐवजी १० संघ खेळू शकतात. आता नव्या २ संघांच्या समावेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नव्या आयपीएल संघासाठी निविदा जाहीर केली आहे.

आयपीएल २०२२ हंगामापासून सामील होणाऱ्या दोन नव्या संघांपैकी एका संघाच्या मालकी आणि संचालन करण्यासाठी बीसीसीआयने निविदा जाहीर केली आहे. तसेच आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने निविदा प्रक्रियेद्वारे बोली आमंत्रित केल्या आहेत.

बोली सादर करताना काही नियम आणि अटी घालण्यात आले आहेत. यात पात्रता सिद्ध करणे, बोली सादर करण्याची प्रक्रिया, प्रस्तावित नवीन संघांचे अधिकार आणि दायित्वे इत्यादी ‘निविदा आमंत्रण’मध्ये समाविष्ट आहे, जे नॉन-रिफंडेबल शुल्काची भरपाई मिळाल्यावर उपलब्ध केले जातील. नॉन-रिफंडेबल शुल्क १० लाख रुपये इतके असेल. तसेच यात वस्तू आणि सेवा कराचाही समावेश आहे. ‘निविदा आमंत्रण’ ५ ऑक्टोबरपर्यंत खरेदीसाठी उपलब्ध असेल.

इच्छुक उमेदवारांनी ‘निविदा आमंत्रण’ खरेदी करण्यासाठी बीसीसीआयने मेल करण्यास सांगितले आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार बोली सादर करू इच्छिणाऱ्या कोणत्याही इच्छुक उमेदवारास ‘निविदा आमंत्रण’ खरेदी करणे आवश्यक आहे. तसेच ‘निविदा आमंत्रण’मध्ये निर्धारित केलेले पात्रता निकष पूर्ण करणारे आणि त्यामध्ये निर्धारित केलेल्या इतर अटींची पात्रता पूर्ण करणारेच बोली लावण्यास पात्र असतील.

याबरोबरच बीसीसीआयने हे देखील स्पष्ट केले आहे की केवळ ही ‘निविदा आमंत्रण’ खरेदी केल्याने कोणालाही बोली लावण्याचा अधिकार मिळत नाही. याबरोबरच या प्रक्रियेतील सर्व आधिकार बीसीसीआयकडे असतील.

महत्त्वाच्या बातम्या – 

लीड्स ते लंडन, भारतीय क्रिकेटर्स लक्झरी ट्रेनने पोहोचले ओव्हलला; पाहा प्रवासातील भारी फोटो

‘तो इथेच चुकतोय’; मोठ्या खेळीसाठी झगडत असलेल्या कोहलीची माजी कसोटीपटूने दाखवून दिली चूक

शाहिद आफ्रिदीला आला तालीबान्यांचा पुळका; केले असे वक्तव्य की, नेटकऱ्यांनी घेतले फैलावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---